अनुष्का शेट्टी नाही तर ही मुलगी बनणार प्रभासची ‘दुल्हनिया’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 01:37 PM2019-08-04T13:37:34+5:302019-08-04T13:41:42+5:30
साऊथ अभिनेता प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्याआधी पुन्हा एकदा प्रभासच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ‘साहो’ रिलीज झाल्यानंतर प्रभास लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. पण अनुष्का शेट्टीसोबत नाही तर दुस-याच एका मुलीसोबत.
साऊथ अभिनेता प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. पण त्याआधी पुन्हा एकदा प्रभासच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. ‘साहो’ रिलीज झाल्यानंतर प्रभास लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. पण अनुष्का शेट्टीसोबत नाही तर दुस-याच एका मुलीसोबत.
होय, ‘टॉलिवूड डॉट नेट’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार प्रभास अमेरिकेतील एक दिग्गज उद्योगपतीच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार आहे. अद्याप प्रभासने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण ही खबर पक्की असल्याचे मानले जात आहे.
अलीकडे एका मुलाखतीत बोलताना, ‘मला माझ्या खाजगी आयुष्यावर बोलायला आवडत नाही. त्यामुळे मला लग्नाबद्दल काही प्रश्न विचारु नका. मी लग्न करेन तेव्हा सर्वांना आवर्जून सांगेन,’ असे तो म्हणाला होता. प्रभासने त्याच्या लग्नावर बोलणे टाळले असले तरी त्याच्या घरातल्यांनी त्याचे लग्न जमवले आहे. प्रभास अमेरिकेतील एका दिग्गज उद्योगपतीच्या मुलीसह लग्न बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
खरे तर प्रभास ‘बाहुबली 2’ रिलीज झाल्यानंतर लग्न करणार होता. पण ‘साहो’मुळे त्याने लग्नाचा बेत पुढे ढकलला. ‘साहो’साठी त्याला बराच वेळ द्यावा लागणार होता. बरीच तयारी करायची होती. त्यामुळे या काळात लग्नाचा विचार त्याने बाजूला ठेवला. पण आता ‘साहो’ रिलीज होता प्रभास लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.
मध्यंतरी प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या अफेअरच्या वावड्या उठल्या होत्या. पण प्रभासने या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे तो म्हणाला होता.
‘साहो’नंतर प्रभासने पुन्हा एकदा साऊथचाच एक चित्रपट साईन केला आहे. दिग्दर्शक के के राधाकृष्ण यांचा हा चित्रपट युव्ही क्रिएशन आणि गोपीकृष्ण मुव्हीज प्रोड्यूस करणार आहे. या चित्रपटात प्रभासच्या अपोझिट अभिनेत्री पूजा हेगडेची वर्णी लागली आहे. प्रभासचा हा चित्रपटही हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये तयार होणार आहे.