बाहुबली प्रभासकडे आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दुसरी सर्वात महागडी कार, वाचा पहिली कुणाकडे आहे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 18:00 IST2021-11-29T17:59:13+5:302021-11-29T18:00:32+5:30
Prabhas News Car : काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की, प्रभासने रोल्स रॉयस फॅंटम कार खरेदी केली आहे. ही बातमी खरी ठरली हे.

बाहुबली प्रभासकडे आहे बॉलिवूड इंडस्ट्रीतील दुसरी सर्वात महागडी कार, वाचा पहिली कुणाकडे आहे?
(Image Credit : zeenews.india.com)
'बाहुबली' फेम प्रभास (Prabhas) हा आपल्या कामाने प्रेक्षकांच्या मनात करतो. त्याचा शांत आणि लाजाळू स्वभावही नेहमीच चर्चेत असतो. त्याची आणखी एक गोष्ट चर्चेत असते. ती म्हणजे त्याची कारची आवड. प्रभासकडे महागड्या लक्झरी कार्सचं भलंमोठं कलेक्शन आहे. आता नुकतीच एक बातमी कन्फर्म झाली की, प्रभासच्या गॅरेजमध्ये सर्वात महागडी कार आली आहे. काही दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की, प्रभासने रोल्स रॉयस फॅंटम (Rolls Royce Phantom) कार खरेदी केली आहे. ही बातमी खरी ठरली हे. प्रभासने ८ कोटी रूपयांची लक्झरी कार खरेदी केली आहे आणि यात आपल्या मनानुसार कस्टमायजेशनसाठी २.५ कोटी रूपये खर्च केले आहेत.
बॉलिवूडमधील दुसरी सर्वात महागडी कार
१०.५ कोटी रूपये किंमत असूनही प्रभासची कार बॉलिवू इंडस्ट्रीतील दुसरी सर्वात महागडी कार आहे. अशात सर्वात महागडी कार कुणाकडे आहे? असा प्रश्न तुम्हाला पडणं सहाजिक आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागडी कार आहे बुगाटी वेरॉन जी १२ कोटी रूपयांची आहे आणि या कारचा मालक आहे बॉलिवूड किंग शाहरूख खान. प्रभासच्या लक्झरी कार कलेक्शनवर नजर टाकली तर त्यात बीएमडब्ल्यू एक्स 3, जगुआर एक्सजे एल 3.0, रेन्ज रोवर एसवी ऑटोबायोग्राफी आणि नुकतीच खरेदी केलेल्या लॅम्बॉर्गिनी अवेंटडोर रोड्सटरचा समावेश आहे.
आलिशान आणि आरामदायक केबिन
रोल्स रॉयस फॅंटमला लक्झरी बनवण्यासाठी यात अनेक फीचर्स दिले आहेत. जे या किंमतीला मिळू शकतात. कारचं केबिन आलिशान आणि आरामदायक आहे. जे शानदार क्वालिटीच्या मेटरिअलने तयार केलं आहे. फॅंटम कारला ६.७५ लीटर ट्विन बर्टोचार्ड् व्ही१२ इंजिन दिलं आहे. जे ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचं आहे.