श्रीरामानंतर प्रभास भगवान विष्णुच्या 'कल्की' अवतारात, काय आहे प्रोजेक्ट के? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:38 PM2023-07-21T14:38:03+5:302023-07-21T14:53:00+5:30

प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून, चित्रपटाचे नावही समोर आले आहे.

Prabhas projectK Movie : After Sri Rama, Prabhas in the 10th incarnation of Lord Vishnu, what is Project K? | श्रीरामानंतर प्रभास भगवान विष्णुच्या 'कल्की' अवतारात, काय आहे प्रोजेक्ट के? जाणून घ्या...

श्रीरामानंतर प्रभास भगवान विष्णुच्या 'कल्की' अवतारात, काय आहे प्रोजेक्ट के? जाणून घ्या...

googlenewsNext

Prabhas's Movie : पॅन इंडिया सुपरस्टार प्रभासने 'बाहुबली' चित्रपटातून भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवली. पण, 'बाहुबली'नंतर प्रभास चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याच्या बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटानेही चाहत्यांची निराशा केली. आता त्याच्या आगामी 'सालार' आणि 'प्रोजेक्ट K' चित्रपटाकडून चाहत्यांना मोठी आशा आहे. 

अनेक दिवसांपासून प्रभासच्या आगामी 'प्रोजेक्ट के' चित्रपटाबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. प्रोजेक्ट K म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात होता. सोशल मीडियावर याबाबत चर्चाही सुरू होत्या. काहीजण म्हणत होते की, हा सुपरहिरो चित्रपट असेल तर काहीजण म्हणत होते हा पौराणिक चित्रपट असेल. आता आज अखेर या चित्रपटाच्या नावामागचा सस्पेन्स समोर आला आहे. अमेरिकेतील सेंट डिएगोच्या कॉमिक कॉनमध्ये या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. यातून चित्रपटाच्या नावासंदर्भातील सस्पेन्स समोर आला आहे. 

नाग अश्विन दिग्दर्शित चित्रपटाचे पूर्ण नाव 'कल्की 2898 एडी' आहे. या चित्रपटात प्रभासचे पात्र भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीपासून प्रेरित असल्याचे म्हटले जात आहे. 'कल्की 2898 एडी' च्या टीझरमध्ये भविष्यातील जग आणि पृथ्वीवर पाप वाढल्याचेही दाखवले आहे. सर्व लोक चिंतेत आहेत, सगळीकडे अराजकता पसरली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रभास अवतार घेतो. या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कलम हसन यांचीही प्रमुक भूमिका आहे.

भगवान कल्कीचा काय संबंध?
प्रोजेक्टच्या या टीझरमध्ये अशा अनेक गोष्टी सूचित करतात की, हा चित्रपट भगवान विष्णूचा 10वा अवतार असलेल्या कल्कीपासून प्रेरित आहे. पहिला संबंध 'कल्की 2898 एडी' नाव आहे. पुराणात असा उल्लेख आहे की, कलियुगात जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल, तेव्हा भगवान विष्णू कल्की अवतारात येतील. टीझरमध्येही प्रभासची खास एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सर्वत्र अंधार, हिंसा आणि पाप वाढत आहे आणि प्रभास पांढऱ्या घोड्यावर बसून येतो. भगवान कल्कीबद्दल असेही म्हटले जाते की, ते पांढऱ्या घोड्यावर बसून येणार आहे. तिसरा संबंध धनुष्यबाणाचा आहे. कल्की धनुष्यबाण वापरातात, असे पुराणात म्हटले आहे. 

भगवान रामानंतर प्रभास कल्कीच्या भूमिकेत 
आदिपुरुषमध्ये प्रभासने भगवान रामाची भूमिका साकारली होती. या चित्रपटालाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आता प्रभास पुन्हा एकदा विष्णूचा अवतार कल्कीच्या रुपात मोठ्या पडद्यावर येणार आहे. हा एक बिग बजेट चित्रपट असून, 500-600 कोटी रुपये बजेट असल्याची माहिती आहे. हा चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Prabhas projectK Movie : After Sri Rama, Prabhas in the 10th incarnation of Lord Vishnu, what is Project K?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.