प्रभास अडकला कोरोना व्हायरच्या जाळ्यात, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 11:00 AM2020-03-23T11:00:16+5:302020-03-23T11:03:12+5:30

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे.

Prabhas In Quarantine After Return From The US, Writing A Script PSC | प्रभास अडकला कोरोना व्हायरच्या जाळ्यात, वाचा सविस्तर

प्रभास अडकला कोरोना व्हायरच्या जाळ्यात, वाचा सविस्तर

googlenewsNext
ठळक मुद्देकोराना व्हाररसची कोणतीच लक्षणं प्रभासमध्ये दिसत नसली तरी तो काळजी घेत आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटातील नायिका देखील सगळ्यांपासून वेगळी राहात आहे.

प्रभास गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील जॉर्जिया येथे त्याच्या आागामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करत असून या चित्रपटाचे नाव काय असणार हे अद्याप ठरलेले नाही. 

कोरोना व्हायरसने जगभरात घातलेल्या थैमानानंतर आता प्रभास या चित्रपटाचे चित्रीकरण अर्धवट टाकून भारतात परतला आहे. भारतात परतल्यानंतर तो गेल्या काही दिवसांपासून सगळ्यांपासून वेगळा राहात आहे. तो त्याच्या आई वडिलांना देखील भेटत नाहीये. कोराना व्हाररसची कोणतीच लक्षणं प्रभासमध्ये दिसत नसली तरी तो काळजी घेत आहे. त्याच्यासोबतच या चित्रपटातील नायिका देखील सगळ्यांपासून वेगळी राहात आहे.

प्रभास सध्या एकांतात असल्याने तो पटकथा लिहित असून या पटकथेवर चित्रपट दिग्दर्शित करण्याचा त्याचा विचार असल्याचे म्हटले जात आहे. कोरोना व्हायरसची स्थिती जगभरात नियंत्रणात आल्यानंतर प्रभास त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक खूपच छान लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

प्रभासने आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही बाहुबली या चित्रपटामुळे मिळाली. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर प्रभास बॉलिवूडकडे वळला. त्याचा साहो हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेज बंद केले जात आहेत. तसेच सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनही काही काळ थांबवण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर भारतातील अनेक राज्यात मॉल्स, थिएटर बंद करण्यात आले आहेत. ऑफिसेसमध्ये देखील अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लोकांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावे. गरज असेल तरच सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय वापरावा असे सरकार गेल्या काही दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगत आहे. 

Web Title: Prabhas In Quarantine After Return From The US, Writing A Script PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.