कंगनाने भविष्यवाणीबद्दल प्रभासला सांगितली होती ही गोष्टी, अभिनेत्याने इतक्या वर्षांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 06:16 PM2022-03-11T18:16:00+5:302022-03-11T18:17:56+5:30
'राधे श्याम' या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान प्रभासने ज्योतिषासंबंधी कंगना रणौतचा (Kangana Ranaut) एक किस्सा सांगितला.
प्रभास (Prabhas) चा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) सिनेमा रिलीज झाला. प्रभाससोबत या सिनेमात पूजा हेगडे आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. यात प्रभास एका प्रसिद्ध ज्योतिषाच्या भूमिकेत आहे. ज्याचं नाव विक्रमातदित्य आहे. यात प्रभासच्या भविष्यवाणी पूर्ण खऱ्या ठरतात. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान प्रभासने ज्योतिषासंबंधी कंगना रणौतचा (Kangana Ranaut) एक किस्सा सांगितला. प्रभासने सांगितलं की, कंगनाने त्याला एकदा सांगितलं होतं की, एका ज्योतिषाने भविष्यवाणी केली होती की ती एक दिवस अभिनेत्री बनेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने इव्हेंट दरम्यान सांगितलं की, कंगना त्याला एकदा म्हणाली होती की, अभिनेत्री होण्याआधी कंगना हिमाचल प्रदेशमध्ये होती. त्यावेळी तिला एका ज्योतिषाने सांगितलं होतं की, ती भविष्यात हिरोईन बनणार. तो पुढे म्हणाला की, 'कंगनाने मला ही गोष्ट आम्ही 'निरंजन' सिनेमाचं शूटींग करत होतो तेव्हा सांगितली होती.ती एका छोट्या शहरात वाढली, तिचा सिनेमाशी काहीही संबंध नव्हता. तिने एका ज्योतिषाबाबत ऐकलं आणि त्यांना भेटायला केरळला गेली. त्या ज्योतिषाने तिला सांगितलं की, ती अभिनेत्री बनेल'.
प्रभासने पुढे असंही सांगितलं की, कंगनाला तर आधी त्या ज्योतिषाच्या भविष्यवाणीवर विश्वास बसला नाही. ती त्याला म्हणाली होती की, 'मी त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष केलं. कारण मी एका छोट्याशा गावातील मुलगी आहे आणि हे लोक मला अभिनेत्री बनणार असं सांगून मूर्ख बनवत आहेत'.
प्रभासने 'राधे श्याम'च्या इव्हेंटमध्ये ज्या घटनेबाबत सांगितलं ती घटना जवळपास १२ वर्ष जुनी आहे. तेव्हा कंगनाने २००९ मध्ये प्रभाससोबत 'एक निरंजन' नावाच्या तेलुगु सिनेमात काम केलं होतं. दरम्यान कंगनाचा जन्म भामला नावाच्या छोट्याशा गावात झाला होता. तिने १८ वर्षांची असताना अनुराग बासू यांच्या गॅंगस्टर सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यांनंतरचं सर्व लोकांना माहीत आहे.