Prabhas : प्रभासचे लग्न न करण्यामागचे कारण आहे सलमान खान? अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 10:22 IST2022-12-19T10:20:55+5:302022-12-19T10:22:06+5:30
हॅंडसम प्रभासच्या आयुष्यात खरंच कोण आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. आता मात्र प्रभासने त्याच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

Prabhas : प्रभासचे लग्न न करण्यामागचे कारण आहे सलमान खान? अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन
Prabhas : बाहुबली प्रभासच्या अफेअरची चर्चा सतत रंगत असते. कधी अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) तर आता क्रिती सेनन (Kriti Sanon) सोबत प्रभासचे नाव जोडले जात आहे. हॅंडसम प्रभासच्या आयुष्यात खरंच कोण आहे याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. आता मात्र प्रभासने त्याच्या लग्नाच्या चर्चांवर मौन सोडले आहे. लग्न कधी करणार या प्रश्नावर त्याने अखेर उत्तर दिले आहे.
लग्नाच्या चर्चांवर प्रभासने सोडले मौन
तेलगु टॉक शो 'अनस्टॉपेबल'मध्ये प्रभास अफेअर, लग्नाच्या चर्चांवर खुलेपणाने बोलला. या शोचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शोचे होस्ट नंदामुरी बालकृष्ण यांनी प्रभासला विचारले, 'नुकताच अभिनेता सर्वानंद शो मध्ये येऊन गेला तेव्हा त्याला लग्न कधी करणार विचारले असता तो म्हणाला प्रभासचे झाल्यानंतर मी करेन. तर आता तु लग्न कधी करणार आहेस?' यावर प्रभासनेही हजरजबाबीपणा दाखवत भन्नाट उत्तर दिले. प्रभास म्हणतो, ' जर सर्वानंद म्हणतोय तो माझ्यानंतर लग्न करणार आहे, तर मी सलमान खान नंतर लग्न करणार आहे असे मला सांगावे लागेल.' प्रभासच्या या उत्तराने सर्वच पोट धरुन हसले.
प्रभास आगामी 'आदिपुरुष' या सिनेमात दिसणार आहे. ओम राऊत यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. भव्य सेट आणि व्हीएफएक्सचा अनुभव देणारा हा सिनेमा असणार आहे. आदिपुरुषमध्ये क्रिती सेनन मुख्य भुमिकेत आहे. या चित्रपटामुळेच प्रभास आणि क्रिती सेननच्या अफेअरची चर्चा जोरदार सुरु झाली. मात्र या चर्चां खोट्या आहेत असे म्हणत क्रितीने पूर्णविराम दिला.