प्रभासचा Adipurush आहे भारतातील सर्वात मोठा बिग बजेट सिनेमा, २० हजार स्क्रीनवर रिलीजसाठी तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 03:38 PM2022-01-31T15:38:36+5:302022-01-31T15:39:40+5:30
Prabhas's Adipurush Budget : प्रभासचा आगामी 'आदिपुरूष' (Adipurush) सिनेमाची चर्चेत आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. महाकाव्य रामायणावर आधारित हा सिनेमा असेल. वेगवेगळ्या अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
प्रभास (Prabhas) आपल्या 'बाहुबली' सिनेमाच्या यशानंतर पॅन इंडिया प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. सध्या 'राधे श्याम' च्या रिलीजची वाट बघत आहे. ज्यात त्याच्यासोबत पूजा हेगडे दिसत आहे. तसेच त्याचा आगामी 'आदिपुरूष' (Adipurush) सिनेमाची चर्चेत आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे. महाकाव्य रामायणावर आधारित हा सिनेमा असेल. वेगवेगळ्या अनेक भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाची निर्मिती टी-सीरीज आणि रेट्रोफाइल्सने केली. प्रभास यात रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सेनन (Kriti Senon) सीतेच्या भूमिकेत दिसेल. सैफ अली खान (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाबाबत ताजी अपडेट आहे की, या सिनेमाचं बजेट ४५० कोटी रूपये क्रॉस झालं आहे.
आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा 'आदिपुरूष'
मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर आदिपुरूषचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. हा सिनेमा इंडियन सिनेमाचा सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक आहे. ज्याचं बजेट ४५० कोटी क्रॉस झालं आहे. हा सिनेमा ५०० कोटीच्या बजेटमध्ये बनवला जात आहे.
टॉलिवूड नेटच्या एका रिपोर्टनुसार, सिनेमाला लागलेला खर्च काढण्यासाठी आदिपुरूषचे निर्माते हा सिनेमा मोठ्या प्रमाणावर रिलीज करण्याचा प्लान करत आहेत. असं सांगितलं जात आहे की, हा सिनेमा जगभरातील २० हजार स्क्रीनवर रिलीज केला जाईल. हे भारतीय सिनेमाचं सर्वात मोठं वर्ल्डवाइज रिलीज असेल. सिनेमा हिंदी आणि तेलुगूमध्ये एकत्र शूट करण्या आला. पण हिंदीत याचं डबिंग केलं जाईल.
१०३ दिवसात झालं शूटींग पूर्ण
मीडिया रिपोर्टनुसार, 'आदिपुरूष' हा सिनेमा १५ भाषांमध्ये रिलीज होणार आहे. यात देशी आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांचा समावेश आहे. जपानी आणि चीनी भाषांमध्ये सिनेमा डब केला जाणार आहे. याआधी प्रभासचा बाहुबली हा सिनेमा ६ हजार स्क्रीनवर रिलीज झाला होता. मेकर्सनी आधीच माहिती दिली की, या सिनेमाचं शूटींग १०३ दिवसांमध्ये पूर्ण झालं. हा सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होण्याची शक्यता आहे.
प्रभासचे आगामी सिनेमे
'आदिपुरूष'आधी प्रभासचा 'राधे श्याम' रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पोस्टपोन केली होती. आदिपुरूष आणि राधे श्यामसोबतच प्रभास बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोनसोबत एका सिनेमात दिसणार आहे. यात अमिताभ बच्चन यांचीही महत्वाची भूमिका असेल. नाग अश्विन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.