Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:03 IST2024-12-16T14:53:00+5:302024-12-16T15:03:29+5:30
संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरीट' सिनेमात मराठमोळी अभिनेत्री दिसणार?

Spirit मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री, प्रभाससोबत रोमान्स करणार; कोण आहे ही?
'बाहुबली', 'सालार' या सिनेमांच्या यशानंतर अभिनेता प्रभास (Prabhas) आगामी 'स्पीरिट' सिनेमात दिसणार आहे. प्रभासच्या या सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. 'अॅनिमल', 'कबीर सिंह' फेम संदीप रेड्डी वांगा सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. २०२१ सालीच या सिनेमाची घोषणा झाली होती. करीना कपूरही सिनेमात दिसणार अशी चर्चा होती . आता यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीचीही एन्ट्री झाली आहे.
'पिंकव्हिला' रिपोर्टनुसार, संदीप रेड्डी वांगा यांनी 'स्पीरिट'साठी अभिनेत्रीचा शोध घेतला आहे. कॉप थ्रिलर सिनेमात प्रभाससोबत 'सीतारामम' फेम अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) रोमान्स करणार अशी चर्चा आहे. करीना कपूर आणि सैफ अली खानही या सिनेमात दिसणार आहेत. त्यामुळे 'कुर्बान','टशन' या फ्लॉप सिनेमांनंतर करीना आणि सैफची जोडी पुन्हा स्क्रीनवर दिसणार आहे. दरम्यान अद्याप मेकर्सने केवळ प्रभासच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
संदीप रेड्डी वांगा सध्या याच सिनेमात व्यस्त आहेत. यानंतरच ते रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल पार्क' हाती घेणार आहेत. स्पिरिट साठी ३०० कोटींचा खर्च येणार आहे. या सिनेमाला दमदार बनवण्यासाठी कोणीच तडजोड करणार नाही. अद्याप सिनेमाच्या रिलीजबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. मात्र २०२६ साली सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.
मृणाल ठाकूर धुळ्याची आहे. तिने सुरुवातीला टीव्ही माध्यमात काम केलं. २०१४ साली 'विटी दांडू' या मराठी सिनेमात ती झळकली होती. तसंच त्याच साली 'कुमकुम भाग्य' या गाजलेल्या मालिकेतही तिची भूमिका होती. यानंतर मृणालने दाक्षिणात्य सिनेमांमध्ये नाव कमावलं. आता साऊथ आणि बॉलिवूड दोन्ही ठिकाणी तिच्या अभिनयाचा डंका आहे.