Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 11:40 AM2023-06-03T11:40:58+5:302023-06-03T11:48:01+5:30

प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची वाट उत्सुकतेने बघत आहेत.

Prabhass adipurush recovered 432 crore rupees from total making budget of 500 crore before releasing the film | Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी?

Adipurush: 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'आदिपुरुष'ने रिलीज आधी कमावले 400 कोटी?

googlenewsNext

प्रभास (Prabhas), क्रिती सनॉन  (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या १६ जून रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर पासून ते आता गाण्यांपर्यंत रिलीज झालेल्या गाण्यापर्यंत सगळ्यालाच प्रेक्षकांची पसंती मिळाली.  

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार हा सिनेमा जवळपास ५०० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार नॉन-थिएटर राईट्स, सॅटेलाइट राईट्स, म्युझिक राईट्स, डिजिटल राईट्स आणि इतर राईट्स विकून 247 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय, चित्रपटाने केवळ थिएटरचे हक्क विकून दक्षिण बाजारपेठेतून 185 कोटी रुपयांची कमाई आहे. यासह आदिपुरुषच्या राईट्समधून आतापर्यंत  ४३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान या चित्रपटात प्रभास प्रभू रामाच्या भूमिकेत, क्रिती माता सीतेच्या भूमिकेत आणि सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान लंकापती रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष'  या चित्रपटात मराठमोळा  देवदत्त नागे (Devdatta Nage) हा हनुमानाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 3D मध्ये पाहता येणार आहे. हा चित्रपट  हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 
 

Web Title: Prabhass adipurush recovered 432 crore rupees from total making budget of 500 crore before releasing the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.