प्रभूदेवाच्या लेकाचा १३ व्या वर्षीच झाला होता मृत्यू, कॅन्सरने घेतले प्राण; नंतर पत्नीला दिला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:59 AM2023-06-14T10:59:00+5:302023-06-14T11:02:46+5:30
प्रभूदेवाचं वादळी खाजगी आयुष्य. लग्न, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट अन् आता ५० वर्षी झाला बाबा
प्रभूदेवा! बस नाम ही काफी है..अभिनेता, दिग्दर्शक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तम डान्सर म्हणून त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. प्रोफेशनल आयुष्यात प्रचंड यश कमावणाऱ्या प्रभूदेवाच्या (Prabhudeva) वैयक्तिक आयुष्यात मात्र बरीच वादळं आली. त्याचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत राहिलं. नुकतंच तो ५० व्या वर्षी पुन्हा बाबा झाला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने मुलीला जन्म दिला. पण प्रभूदेवाने काही वर्षांपूर्वी आपल्या अवघ्या १३ वर्षांच्या मुलाला गमावले आहे.
डान्सर प्रभूदेवाने 2020 साली हिमानी सिंहसोबत दुसरं लग्न केलं. लग्नानंतर तीन वर्षांनी त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं आहे. तर प्रभुदेवाच्या पहिल्या पत्नीचं नाव रामलता होतं. तिच्यापासून त्याला तीन मुलं झाली. मात्र 2008 साली त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा विशालला ब्रेन कॅन्सरचं निदान झालं. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. यामुळे तो पूर्णपणे खचला होता. ही घटना १५ वर्षांपूर्वीची आहे.
लेकाच्या निधनानंतर काही वर्षात प्रभूदेवा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला. याला कारण ठरलं ते म्हणजे प्रभूदेवाचं विवाहबाह्य प्रेमसंबंध. साऊथची आघाडीची अभिनेत्री नयनतारा आणि प्रभूदेवा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघंही लिव्हइन मध्ये राहायला लागले होते. मात्र प्रभूदेवाच्या पत्नी रामलता त्याला घटस्फोट देण्यास तयार नव्हती. त्यामुळे प्रभूदेवा आणि नयनतारा यांचं नातं फार काळ टिकलं नाही तर रामलतानेही नंतर प्रभूदेवाला घटस्फोट दिला. यानंतर प्रभूदेवा बराच काळ एकटाच जगत राहिला.
2020 मध्ये त्याने हिमानी सिंहसोबत लग्न उरकलं. या लग्नाची जोरदार चर्चाही झाली. आता तो मुलीच्या जन्मामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.