Galwan Tweet Controversy: रिचा चड्ढाच्या बचावासाठी प्रकाश राज सरसावले, अक्षय कुमारला सुनावलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 02:32 PM2022-11-26T14:32:26+5:302022-11-26T14:38:33+5:30
अनेक सेलिब्रेटींनी आतापर्यंत रिच्या विरोधात ट्विट केलं आहे. दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी रिचा चढ्ढाचं समर्थन केलं आहे.
भारतीय सैनिकांचा अपमान केल्याप्रकरणी रिचा चड्डावर सध्या टीका होत आहे. अभिनेता अक्षय कुमारनेही रिचाच्या त्या ट्विटचा निषेध केला होता. तर आता रिचाच्या अडचणीत वाढ झाली आहे. फिल्मनिर्माते अशोक पंडीत यांनी रिचा विरोधात police complaint तक्रार दाखल केली आहे. प्रकरण वाढतंय हे बघून रिचाने या संपूर्ण प्रकरणावर दुसऱ्या ट्विटमध्ये माफी मागितली. मात्र, त्यानंतरही हे प्रकरण शांत झालं नाही, उलट अधिकच तापले. एकापाठोपाठ एक सेलिब्रिटी तिच्याविरोधात ट्विट करू लागले. दरम्यान, दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी रिचा चढ्ढाचं समर्थन केलं आहे.
रिचा चढ्ढा विरोधात ट्विट केल्याबद्दल दक्षिणेतील अभिनेते प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला फटकारले आहे. अक्षयच्या ट्विटला रिट्विट करत त्यांनी लिहिले, 'अक्षय कुमार तुझ्याकडून ही अशी अपेक्षा नव्हती... तुमच्यापेक्षा रिचा चढ्ढा आमच्या देशासाठी जास्त संबंधित आहे. याआधीही प्रकाश राज यांनी रिचाच्या गलवान ट्विटवर लिहिले होते- 'आम्ही रिचा चढ्ढा तुझ्यासोबत आहोत.' असं त्यांनी म्हटलं होतं.
Didn’t expect this from you @akshaykumar ..having said that @RichaChadha is more relevant to our country than you sir. #justaskinghttps://t.co/jAo5Sg6rQF
— Prakash Raj (@prakashraaj) November 25, 2022
अक्षय कुमारचं ट्विट
अक्षय कुमारने ट्विट करत म्हटले होतं, "हे पाहून त्रास होतो. कोणत्याही गोष्टीने आपल्याला आपल्या सशस्त्र दलांबद्दल कधीही कृतघ्न बनवता कामा नये. ते आहेत म्हणून आज आपण आहोत". अक्षय कुमारने भारतीय सैनिकांचे महत्त्व स्पष्ट करताना रिचा चढ्ढाला चांगलेच सुनावले.
Hurts to see this. Nothing ever should make us ungrateful towards our armed forces. Woh hain toh aaj hum hain. 🙏 pic.twitter.com/inCm392hIH
— Akshay Kumar (@akshaykumar) November 24, 2022
काय होतं रिचाचं ट्विट?
भारतीय सेनेचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या विधानावर रिचाने प्रतिक्रिया दिली आहे. लेफ्टिनंट जनरल म्हणाले, "जर सरकारने आदेश दिला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत." यावर रिच्चाने एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीट केले, "Galwan says hi", अर्थात गलवान हाय म्हणत आहे. खरं तर याप्रकरणी भाजप नेते मंजिंदर सिंह यांनी रिचावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मुंबई पोलिसांना केली आहे. रिचाचे विचार हे भारतविरोधी आहेत. ती राहुल गांधींची समर्थक आहे. असे त्यांनी म्हटले आहे