Prakash Raj : 'हिंदी माहित नाही, जा!' प्रकाश राज यांच्या जुन्या ट्वीटवरुन पुन्हा वाद, FIR दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 01:37 PM2023-03-08T13:37:17+5:302023-03-08T13:39:27+5:30
अभिनेता प्रकाश राज यांचं एक तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे.
Prakash Raj : अभिनेता प्रकाश राज यांचं एक तीन वर्षांपूर्वीचं ट्वीट पुन्हा व्हायरल होत आहे. १३ सप्टेंबर २०२० रोजी त्यांनी एक फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोतील शर्टवर जो मजकूर होता त्याने वाद उफाळून आला होता. त्यावर लिहिले होते, 'मला हिंदी माहित नाही, जा.' आता तीन वर्षांनंतर हा फोटो पुन्हा व्हायरल होण्यामागचं कारण म्हणते सुप्रीम कोर्टाचे वकील शशांक शेखर यांनी प्रकाश राज यांचा हा फोटो ट्वीट करत एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
वकील शशांक शेखर यांनी तमिळनाडू पोलिसांना टॅग करत प्रश्न विचारला आहे. ते म्हणतात, 'तुम्ही प्रकाश राज विरोधात एफआयआर दाखल केली का?' तर यावर प्रकाश राज यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे.
त्यांनी ट्वीट केले, 'माझं मूळ, माझी मातृभाषा कन्नड आहे. जर तिचा अनादर केला किंवा तुमची भाषा थोपवण्याचा प्रयत्न केला..तर आम्ही अशाप्रकारे विरोध करु. तुम्ही धमकी देत आहात का ? असंच विचारलं.'
ನನ್ನ ಬೇರು.. ನನ್ನ ಮೂಲ ನನ್ನ ಕನ್ನಡ.. ನನ್ನ ತಾಯನ್ನು ಗೌರವಿಸದೆ ನಿನ್ನ ಹಿಂದಿಯನ್ನು ಹೇರಿದರೆ ನಾವು ಹೀಗೇ ಪ್ರತಿಭಟಿಸುತ್ತೇವೆ .. ಹೆದರೊಲ್ಲ..ಅಷ್ಟೇ..My roots..my mother tongue is KANNADA .. if you DISRESPECT her and try to FORCE your language.. we will PROTEST like this. R u threatening #justaskingpic.twitter.com/JaRLOhGKTT
— Prakash Raj (@prakashraaj) March 6, 2023
आणखी एक ट्वीट करत ते म्हणाले, 'मला सात भाषा येतात. एखादी भाषा शिकणं आणि ती बोलणं म्हणजे त्या लोकांचा आदर करणं आहे. मी माझी भाषा कोणावर थोपवत नाही. पण जर कोणी तिचा अनादर केला तर मी त्याविरोधात आवाज उठवेन. #stopHindiImposition #justasking
I speak 7 languages .To learn n speak a language is RESPECTING its people . I have learned every language of the people I work with. I don’t force my language. But if you disrespect mine and force your language I will stand up and protest #stopHindiImposition#justasking
— Prakash Raj (@prakashraaj) March 7, 2023
२०२० मध्ये हिंदी दिवस साजरा करताना काही दाक्षिणात्य अभिनेत्यांनी याचा विरोध केला होता. यामध्ये प्रकाश राज, धनंजय आणि वरिष्ठ एन सिन्हा यांनी हिंदी भाषा थोपली जाते त्यावरुन मत व्यक्त केलं होतं.