Prakash Raj : काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:32 PM2023-02-07T13:32:57+5:302023-02-07T13:33:08+5:30

Prakash Raj : बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Prakash Raj slams the Boycott gang on Pathan’s success | Prakash Raj : काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया

Prakash Raj : काळजी करू नका, ते फक्त भुंकतात...,‘बॉयकॉट पठाण’वर प्रकाश राज यांची जळजळीत प्रतिक्रिया

googlenewsNext

साऊथचा सुपर ‘व्हिलन’ प्रकाश राज (Prakash Raj ) यांनी पडद्यावर केवळ खलनायक साकारला नाही तर अनेक विनोदी व्यक्तिरेखाही साकारल्या. त्यांच्या अभिनयाचे करोडो चाहते आहेत. ‘सिंघम’ सिनेमात त्यांनी साकारलेला जयकांत शिक्रे तर विसरणं शक्यच नाही. प्रकाश राज हे आपल्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. राजकीय मुद्यांवरही ते अगदी ठामपणे मतं मांडताना दिसतात.  आता प्रकाश राज यांनी बायकॉट पठाण मुद्यावर परखड मत मांडलं आहे. 
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण रिलीजआधी या चित्रपटावरून मोठा वाद झाला होता. 'पठाण'चं बेशरम रंग हे गाणं रिलीज होताच, हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. चित्रपटाला बॉयकॉट करण्याची जोरदार मागणी झाली होती. अर्थात बायकॉट गँगच्या विरोधानंतरही 'पठाण' तुफान चालतोय. आता प्रकाश राज यांनी यावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ केरळमधील एका साहित्य महोत्सवातील आहे.

काय म्हणाले प्रकाश राज?
“पठाणच्या कमाईनं बायकॉट गँगची तोंड बंद झाली आहेत. त्यांना पठाण बॅन करायचा होता. पण याऊपर या चित्रपटाने ७०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. ते मूर्ख लोक पठाणवर बंदी घालू इच्छित होते. पण हेच मूर्ख लोक मोदींच्या चित्रपटाला ३० कोटींचा व्यवसायही मिळवून देऊ शकले नाहीत. ते फक्त भुंकत आहेत, ते चावत नाहीत. काळजी करू नका. हे फक्त ध्वनीप्रदूषण आहे, बाकी काहीही नाही,” अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली.   

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा सिनेमा गेल्या २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत हा सिनेमा छप्परफाड कमाई केली आहे.  सोमवारच्या कमाईनंतर त्याने यशच्या KGF: Chapter 2 ला मागे टाकलं आहे. देशात या चित्रपटाने सुमारे ४३८.५ कोटी रुपये कमावले आहेत. तर, जगभरात या चित्रपटाने ११४८ कोटींचा गल्ला जमवला आहे. 

Web Title: Prakash Raj slams the Boycott gang on Pathan’s success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.