अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’मध्ये झाली या साऊथ बालेची एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 04:00 PM2019-04-07T16:00:00+5:302019-04-07T16:00:02+5:30
अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव.
अजय देवगणच्या ‘भूज- द प्राईड ऑफ इंडिया’ या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. आता या चित्रपटात आणखी एका हिरोईनची एन्ट्री झालीय. होय, साऊथची लोकप्रिय अभिनेत्री प्रनीता सुभाष हे या अभिनेत्रीच नाव.
प्रनीताने आत्तापर्यंत साऊथच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. ‘पोर्की’ या कन्नड चित्रपटातून प्रनीताने आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. यानंतर तामिळ, कन्नड, तेलगू अशा सुमारे २५ दाक्षिणात्य चित्रपटात ती झळकली. २६ वर्षांची प्रनीता आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय आणि पहिल्याच चित्रपटात तिला सुपरस्टार अजय देवगणसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
Pranitha Subhash, who has worked in several South Indian films, signs her first Hindi film: #BhujThePrideOfIndia... Stars Ajay Devgn, Sanjay Dutt, Rana Daggubati, Sonakshi Sinha, Parineeti Chopra and Ammy Virk... Directed by Abhishek Dudhaiya... 14 Aug 2020 release. pic.twitter.com/fq4XsMc8WX
— taran adarsh (@taran_adarsh) April 6, 2019
अजय देवगण स्टारर या चित्रपटात प्रनीता, सोनाक्षी, परिणीतीशिवाय साऊथ स्टार राणा दग्गुबती, एमी विर्क आणि संजय दत्त हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अभिषेक दुधिया दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान भूज विमान तळाचे प्रभारी स्क्वॉड्रन लीडर विजय कर्णिक यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.
१९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यान विजय कर्णिक भूज विमानतळावर तैनात होते. पाकी हवाई हल्ल्यात भूज तळावरची धावपट्टी ध्वस्त झाली होती. ही धावपट्टी पुन्हा उभारणे गरजेचे होते. अशावेळी विजय कर्णिक यांनी धाडसी निर्णय घेत, बाजूच्या गावातील महिलांच्या मदतीने ही धावपट्टी उभारली होती. भारत-पाक युद्धात या धावपट्टीचे योगदान महत्त्वाचे राहिले आणि पयार्याने ही धावपट्टी नव्याने उभारणारे विजय कर्णिक यांचे योगदानही अनन्यसाधारण ठरले.