​सेन्सॉर बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी पहिल्याच दिवशी अनुपस्थित!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 09:27 AM2017-08-16T09:27:37+5:302017-08-16T14:57:37+5:30

सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची कारकिर्द बरीच वादळी ठरली. त्यांच्या जागी गीतकार, पटकथा लेखक आणि अ‍ॅड गुरु ...

Prasun Joshi, newly appointed Censor Board absent on the first day! | ​सेन्सॉर बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी पहिल्याच दिवशी अनुपस्थित!

​सेन्सॉर बोर्डाचे नवनियुक्त अध्यक्ष प्रसून जोशी पहिल्याच दिवशी अनुपस्थित!

googlenewsNext
न्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांची कारकिर्द बरीच वादळी ठरली. त्यांच्या जागी गीतकार, पटकथा लेखक आणि अ‍ॅड गुरु प्रसून जोशी हे यांची सेन्सॉर बोर्ड आॅफ फिल्म सर्टिफिकेशनच्या  अध्यक्षपदी वर्णी लागली. गत आठवड्यात या पदावर नियुक्ती झालेले प्रसून जोशी यांना गत सोमवारपासून कार्यालयात रूजू व्हायचे होते. पण पहिल्याच दिवशी ते गायब राहिले. साहजिक त्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाजासंदर्भात अफरातफरी माजली.
सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी जाण्यापूर्वी अनेक चित्रपटांना सर्टिफिकेट देऊन गेलेत. यात येत्या शुक्रवारी रिलीज होऊ घातलेल्या ‘बरेली की बर्फी’ आणि ‘अ जेंटलमॅन’ या चित्रपटांचाही समावेश आहे. नियमानुसार, या चित्रपटांच्या निर्मात्यांना सोमवारी आपले सर्टिफिकेट कलेक्ट करायचे होते. मात्र सोमवारी निर्माते सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले असता प्रसून जोशी गायब होते. तेच हे सर्टिफिकेट जारी करणार असल्यामुळे निर्माते अडचणीत आले. त्यांनी लगेच निहलानी  यांच्याशी संपर्क साधला. निहलानी यांनी निर्मात्यांची मदत केली. सर्टिफिकेट अटकले असते तर ‘बरेली की बर्फी’ या शुक्रवारी रिलीज होणे कठीण होते.यासंदर्भात प्रसून जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, मी कुठलीही घाई करू इच्छित नाही, असे उत्तर त्यांनी दिली. काम सुरु करण्यापूर्वी मी माझ्या जबाबदाºया समजून घेऊ इच्छितो. मी घाई करणार नाही, असे ते म्हणाले.
१९ जानेवारी २०१५ रोजी पहलाज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्यावर नाराज होते. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झालेल्या ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि सध्या प्रसिद्धीच्या वाटेवर असलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. या सगळ्या कारणांवरून त्यांच्याविरुद्धचा रोष सातत्याने वाढत होता. गेल्याच आठवड्यात काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेतली होती. यावेळी त्यांनी पहलाज निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. 

Web Title: Prasun Joshi, newly appointed Censor Board absent on the first day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.