प्रसून जोशी म्हणतात, पद्मावतीमध्ये 26 कट सुचवल्याची गोष्ट खोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 10:12 AM2018-01-01T10:12:22+5:302018-01-01T16:48:57+5:30

संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट पद्मावतीला सेन्सॉर बोर्डाने 26 कट्स सांगितले नाहीत त्यात पाच बदल सुचवत U/A प्रमाणपत्र दिले ...

Prasun Joshi says, "The story of suggesting the 26 fixing in Padmavati is false | प्रसून जोशी म्हणतात, पद्मावतीमध्ये 26 कट सुचवल्याची गोष्ट खोटी

प्रसून जोशी म्हणतात, पद्मावतीमध्ये 26 कट सुचवल्याची गोष्ट खोटी

googlenewsNext
जय लीला भन्साळी यांचा चित्रपट पद्मावतीला सेन्सॉर बोर्डाने 26 कट्स सांगितले नाहीत त्यात पाच बदल सुचवत U/A प्रमाणपत्र दिले आहे असे सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसून जोशीनी सांगितले आहेत. तसेच या चित्रपटाचे नाव बदलून पद्मावत ठेवण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट वादात सापडला आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीज डेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र सेन्सॉरने हा चित्रपट जयपूरमधील दोन प्रख्यात इतिहासकारांना आमंत्रित केले होते. या इतिहासकारांमध्ये प्रो. बी. एल. गुप्ता आणि प्रो. आर. एस. खांगराट यांचा समावेश आहे. यानंतर शनिवारी झालेल्या सीबीएफसीच्या बैठकीत चित्रपटाला U/A सर्टिफिकेट देण्याचा निर्णय घेतला. 

प्रसून जोशी यांनी माध्यमांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये लिहिले आहे की, सेन्सॉरने चित्रपटात कोणत्याही कट सांगितले नाहीत फक्त पाच सीन्सवर संशोधन करायला सांगितले होते. निर्मात्यांना चित्रपट डिस्क्लेमर बदल करायला सांगितले आहेत  पद्मावतीचे नाव बदलून ते म्हणाले पद्मावत ठेवण्यात आले आहे. कारण हा चित्रपट इतिहासातून नाही तर काल्पनिक कथा पद्मावतवर आधरित आहे. सेन्सॉरने याशिवाय घूमर गाण्यातही काही बदल सुचवले आहेत.    

हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच वादात सापडला. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत राजपूत करणी सेनेने केला होता. मात्र संजय लीला भन्साळी यांनी हा आरोप नेहमीच फेटाळला होते. कुणाच्याही भावना दुखावतील, असे काहीही चित्रपटात नाही. असे असतानाही करणी सेनेचा चित्रपटाला विरोध कायम आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने 'पद्मावती’चा विरोध कायम ठेवणार आहोत असे राजपूत करणी सेनेचे संयोजक लोकेंद्र सिंग कालवी यांनी म्हटले आहे. यात चित्रपटात राणी पद्मावतीची भूमिका साकारणाºया दीपिका पादुकोणचे नाक कापण्याचीही धमकी याआधी करणी सेनेने दिली होती. 

ALSO READ :  करणी सेनेचा आरोप; अंडरवर्ल्डच्या दबावामुळेच सेन्सॉरने ‘पद्मावती’ला दाखविला हिरवा कंदील !

दीपिका पादुकोण शिवाय यात रणवीर सिंग आणि शाहिद कपूरसुद्धा आहे. शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे.  तर रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग प्रथमच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.  अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.

Web Title: Prasun Joshi says, "The story of suggesting the 26 fixing in Padmavati is false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.