अभिनेता प्रतिक बब्बरचा कोरोना रिपोर्ट आला समोर, सोशल मीडियावर शेअर केला टेस्टिंग व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:06 IST2020-08-17T18:01:02+5:302020-08-17T18:06:22+5:30

अभिनेता प्रतिक बब्बरने त्याची कोरोना टेस्ट केली आहे.

Prateik babbar tested corona virus negative shared testing video on social media | अभिनेता प्रतिक बब्बरचा कोरोना रिपोर्ट आला समोर, सोशल मीडियावर शेअर केला टेस्टिंग व्हिडीओ

अभिनेता प्रतिक बब्बरचा कोरोना रिपोर्ट आला समोर, सोशल मीडियावर शेअर केला टेस्टिंग व्हिडीओ

अभिनेता प्रतिक बब्बरने त्याची कोरोना टेस्ट केली आहे. कोरोना टेस्ट करतानाचा व्हिडीओ प्रतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याच्या नाकात एक स्ट्रिप टाकली जाते आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रतिकने लिहिले की, कोरोना टेस्ट नेगेटीव्ह आला आहे. सगळ्यांचे आभार. प्रतिकची कोरोना टेस्ट नेगेटीव्ह आल्यानंतर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. 

वर्कफ्रंट बाबात बोलायचे झाले  तर प्रतिक हिंदी आणि साऊथच्या सिनेमांमध्ये अॅक्टिव्ह असतो. प्रतिक मुंबई सागामध्ये दिसणार आहे. यात तो श्याम जाधव नावाची भूमिका साकारणार आहे. रणबीर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र सिनेमात देखील तो दिसणार आहे. 
प्रितीकने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2008 मध्ये आलेल्या 'तू तू ... या जाने ना' या चित्रपटाद्वारे केली होती. यातली त्यांची भूमिका फॅन्सना खूप आवडली होती.यानंतर तो धोबी घाट, दम मारो दम, एक दिवाना था, बागी 2 अशा चित्रपटांमध्ये दिसला.
 पण या चित्रपटांना फार यश मिळू शकले नाही. 

Web Title: Prateik babbar tested corona virus negative shared testing video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.