प्री-दिवाळी विकचा बॉलिवूडला धसका! दिपावली शुभशकून; त्यापूर्वी अपशकून?

By संजय घावरे | Published: October 16, 2022 08:00 AM2022-10-16T08:00:00+5:302022-10-16T08:00:00+5:30

दिवाळी पूर्वीच्या आठवड्यात मात्र एकही सिनेमा रिलीज होत नाही. हिंदी सिनेसृष्टीची हि परंपरा यंदाही अबाधित राहणार आहे.

Pre-Diwali Vic hits Bollywood! Diwali Good Omens; Ominous before that? | प्री-दिवाळी विकचा बॉलिवूडला धसका! दिपावली शुभशकून; त्यापूर्वी अपशकून?

प्री-दिवाळी विकचा बॉलिवूडला धसका! दिपावली शुभशकून; त्यापूर्वी अपशकून?

googlenewsNext

 इंग्रजी नववर्ष जरी जानेवारीपासून सुरू होत असले तरी हिंदी सिनेसृष्टीचे खरे वर्ष दिवाळीत सुरू होते. दिवाळीला एखादा चित्रपट हिट झाल्यास नोव्हेंबर-डिसेंबरचा सीझन चांगला जातो अशी हिंदी सिनेसृष्टीची धारणा आहे. दिवाळी पूर्वीच्या आठवड्यात मात्र एकही सिनेमा रिलीज होत नाही. हिंदी सिनेसृष्टीची हि परंपरा यंदाही अबाधित राहणार आहे.

दिवाळीला चोपडी पूजन करून व्यापारी नवे वर्ष सुरू करतात, तसे सिनेसृष्टीतील प्रोडक्शन हाऊसेसचे नवे वर्ष बलिप्रतिपदेपासून सुरू होते. दिवाळीला शुभशकून मानला जात असल्याने या सणाला सिनेमा रिलीज करण्यासाठी पूर्वीही निर्माते प्रयत्नशील असायचे आणि आजही आहेत. सुभाष घई, यश चोप्रा, जे. पी. दत्ता, जे. ओमप्रकाश, शक्ती सामंत, यश जोहर, रोहित शेट्टी, सूरज बडजात्या यांनी दिवाळीचे लक्ष्य नजरेसमोर ठेवून निर्मिती केली आहे. मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा आणि मेमध्ये लोक फिरायला जात असल्याने हा हंगाम सिनेमांसाठी दुष्काळी ठरतो. दिवाळीत सुट्ट्याही खूप असल्याने सिनेमांचाही बार उडवला जातो. मागील दहा वर्षांवर दृष्टीक्षेप टाकल्यास दिवाळीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे प्रमाण खूप मोठे असल्याचे जाणवेल. दिवाळीपूर्वीचा आठवडा म्हणजेच प्री-दिवाळी विक मात्र चित्रपट प्रदर्शनासाठी अपशकूनी मानला जातो. त्यामुळे प्री-दिवाळी वीकमध्ये मोठा हिंदी सिनेमा रिलीज केला जात नाही. मागच्या शुक्रवारी 'डॅाक्टर जी', 'कोड नेम : तिरंगा', 'ऐ जिंदगी', 'मोदीजी की बेटी', 'कहानी रबर बँड की', 'लव्ह यू लोकतंत्र' आदी कमी बजेटचे सिनेमे रिलीज झाले. दिवाळीला 'थँक गॅाड' आणि 'राम सेतू' हे मोठे सिनेमे येणार आहेत, पण या दोन आठवड्यांमध्ये येणाऱ्या शुक्रवारी एकही हिंदी-मराठी सिनेमा रिलीज होणार नाही. यंदाही दिवाळीच्या अगोदरच्या आठवड्यात कोणत्याही निर्मात्याने सिनेमा रिलीज करण्याचे धाडस दाखवले नाही. दिवाळीच्या अगोदरच्या आठवड्यात रिलीज झालेला चित्रपट चांगला व्यवसाय करत नसल्याची अंधश्रद्धा निर्मात्यांमध्ये आहे. काही निर्मात्यांनी याची प्रचितीही घेतली आहे. दिवाळी पूर्वीच्या आठवड्यात रिलीज झालेल्या मोठमोठ्या सिनेमांची धुळधाण उडाली आहे. त्यामुळे दिवाळीला दोन-तीन मोठे सिनेमे रिलीज होतात, पण त्यापूर्वी नाही. भाऊबीजेच्या दिवशी रिलीज झालेल्या सिनेमांनीही चांगला बिझनेस केला आहे, पण दिवाळी पूर्वीचा आठवडा कायम कोरडाच राहीला आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही.
........................... 
वर्ष - चित्रपट - व्यवसाय
२०११ - रा. वन - ११५ कोटी
२०१२ - जब तक है जान - १२२ कोटी
२०१३ - क्रिष ३ - २४४.९२ कोटी
२०१४ - हॅपी न्यू ईयर - २०५ कोटी
२०१५ - प्रेम रतन धन पायो - २१० कोटी
२०१६ - ऐ दिल है मुश्कील - ११२.५० कोटी
२०१७ - गोलमाल अगेन - २०५.७० कोटी
२०१८ - ठग्ज आॅफ हिंदोस्तान - १४५.२९ कोटी
२०१९ - हाऊसफुल ४ - २०८.५० कोटी
२०२० - सूरज पे मंगल भारी - ४.३२ कोटी
२०२१ - सूर्यवंशी - २९४.९१ कोटी
.............................

- रमेश थाडानी (वितरक, मालक - मल्टिमीडिया कम्बाईन्स)
लोकं फेस्टिव्हलच्या खरेदीत बिझी असल्याने प्री-दिवाळी विकमध्ये चित्रपटांचे कलेक्शन खूप कमी होते. दिवाळीत लोकांना सुट्टी असल्याने त्याचवेळी मोठे चित्रपट रिलीज होतात. दिवाली के बादही सिनेसृष्टीच्या नववर्षाला खरी सुरूवात होते. दिवाळीत येणारे सिनेमे सिनेसृष्टीला सकारात्मक उर्जा प्रदान करतात.
......................

- मुरली चटवाणी (मॅनेजींग पार्टनर, पॅनोरमा स्टुडिओज - डिस्ट्रीब्युशन )
दिवाळीला मोठे सिनेमे रिलीज होत असल्याने त्या पूर्वीच्या आठवड्यात रिलीज झालेल्या सिनेमांना कंटिन्यूटी मिळत नाही. त्यामुळे प्री-दिवाळी विक सिनेसृष्टीसाठीही 'वीक' ठरतो. त्या पूर्वीच्या आठवड्यात आठवडाभर चालणारे सिनेमे रिलीज होतात, जे दिवाळीपर्यंत टिकत नाहीत. 'जब वी मेट' आणि 'बाजार'सारखे काही सिनेमे अपवाद ठरतात.

Web Title: Pre-Diwali Vic hits Bollywood! Diwali Good Omens; Ominous before that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.