घर भाड्याने देताना बाळगा सावधगिरी; अन्यथा ‘या’ अभिनेत्रीप्रमाणे होतील हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 12:54 PM2018-02-20T12:54:19+5:302018-02-20T18:24:41+5:30
जर तुम्हीही भाडेकरू ठेवू इच्छिता तर सावधानता बाळगणे खूप आवश्यक आहे. कारण बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडू हिच्यासोबत जे घडले ...
ज तुम्हीही भाडेकरू ठेवू इच्छिता तर सावधानता बाळगणे खूप आवश्यक आहे. कारण बॉलिवूड अभिनेत्री मेघना नायडू हिच्यासोबत जे घडले कदाचित ते तुमच्यासोबतही घडू शकते. होय, मेघनाने फेसबुकवर तिच्यासोबत झालेल्या फ्रॉडबद्दलचा खुलासा केला आहे. मेघनाने सांगितले की, गावाकडे असलेल्या तिच्या घरातील भाडेकरूने मासिक भाडे तर दिले नाहीच, शिवाय घरातील सामान घेऊन तो पसार झाला. मेघनाने या पोस्टसोबत एक फोटोदेखील शेयर केला असून, चाहत्यांना तो अधिकाधिक शेअर करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देता येईल.
मेघनाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, गावाकडे असलेले घर माझ्या केअर टेकरने दोन लोकांना भाड्याने दिले होते, घर भाड्याने घेताना त्यांनी स्वत:ला कपल म्हणून सांगितले होते. त्यांनी केअर टेकरला म्हटले होते की, आम्ही मुंबई राहणारे असून, न्यूझिलॅण्डमध्ये काम करतो. त्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स आयडी प्रुफ म्हणून दिले होते. मात्र एकेदिवशी रातोरात भाडे न देताच ते फरार झाले. यावेळी त्यांनी घरातील सर्व सामानही लंपास केले.
">मेघनाने तिच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, गावाकडे असलेले घर माझ्या केअर टेकरने दोन लोकांना भाड्याने दिले होते, घर भाड्याने घेताना त्यांनी स्वत:ला कपल म्हणून सांगितले होते. त्यांनी केअर टेकरला म्हटले होते की, आम्ही मुंबई राहणारे असून, न्यूझिलॅण्डमध्ये काम करतो. त्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स आयडी प्रुफ म्हणून दिले होते. मात्र एकेदिवशी रातोरात भाडे न देताच ते फरार झाले. यावेळी त्यांनी घरातील सर्व सामानही लंपास केले.
कपडे, शूज आणि स्पीकर घेऊन ते पसार झाले. मेघनाने सांगितले की, चोरट्यांनी अंडरवियरसह सॉक्सही नेले. मेघनाने तिच्या मॅसेजमध्ये पुढे लिहिले की, चोरांनी घरातील काही सामानाची तोडफोडही केली. घरात स्टेटस आणि फ्रेम्स तुटलेल्या अवस्थेत मिळाल्या. तर फर्निचर जागेवर हलविले आहे. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लॉकही बदलले आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांनी मेघनाच्या केअर टेकरकडूनही ८५ हजार रुपये घेतले होते. तुझ्या मुलाला न्यूझिलॅण्डमध्ये काम मिळवून देईल, अशी बतावणी करून त्यांनी हे पैसे घेतले होते.
याव्यतिरिक्त अन्य एक महिलेकडूनही त्यांनी ४० हजार रूपये घेतले होते. तसेच एका व्यक्तीकडून जमिनीचे पेपर घेतले आहेत. मेघनाने ही पोस्ट शेअर करताना लोकांना अपील केली की, ती अधिकाधिक शेअर करावी. तसेच ते मिळाल्यास तातडीने त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे, असे आवाहनही तिने केले.