दिवाळीत प्रेग्नेंट करीना कपूर खानचा आहे स्पेशल प्लान, मुंबईत नाही करणार सेलिब्रेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2020 17:46 IST2020-11-12T17:45:47+5:302020-11-12T17:46:25+5:30
करीना कपूर खान लवकरच दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

दिवाळीत प्रेग्नेंट करीना कपूर खानचा आहे स्पेशल प्लान, मुंबईत नाही करणार सेलिब्रेट
बॉलिवूडमधील जास्तीत जास्त सेलिब्रेटींनी यंदा दिवाळी आपल्या कुटुंबासोबत आणि काही निवडक मित्रमंडळींसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही सेलिब्रेटींनी आधीच दिवाळी पार्टी रद्द केली आहे. कोरोनानंतर कामावर परतलेले इतर कलाकार यावर्षी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्याची शक्यता कमी आहे.
नुकतेच करीना कपूर खान शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे आणि सैफ अली खान काही दिवसांपूर्वी आगामी चित्रपट भूत पुलिसच्या शूटिंगसाठी धर्मशालाला गेला आहे. करीना आणि सैफच्या दिवाळी सेलिब्रेशनबद्दल सांगायचं तर करीनाने सांगितले की यंदा ती मुंबईच्या झगमगाटीपासून दूर दिवाळी साजरी करणार आहे.
तिने सांगितले की, यंदा दिवाळी हिमाचल प्रदेशमधील धर्मशालामध्ये साजरी करणार आहे. तिथेच तैमूरदेखील दिवाळी साजरी करताना दिसणार आहे. दिवाळी प्लान्सबद्दल करीनाने सांगितले की, पर्वतात प्रवास करणे आणि मोकळ्या आकाशाखाली सुर्यांची ऊन पाहत काही वेळ व्यतित करणे खूप सुंदर असेल.
करीनाने हेदेखील सांगितले की, या वर्षी जास्त वेळ घरीच राहिली आहे अशात घरापासून दूर राहणे एक बराच वेळ धर्मशालामध्ये व्यतित करणे एक चांगला अनुभव असेल. करीना कपूर खान दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे आणि लवकरच चौथा सदस्य त्यांच्या घराचा हिस्सा बनणार आहे.
करीना कपूरने नुकतेच लाल सिंग चड्ढा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमीर खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीत रिलीज होणार आहे.