सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये काय दाखवलं? 'डिंपल गर्ल'च्या एक्सप्रेशनने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:26 IST2025-04-23T10:25:57+5:302025-04-23T10:26:12+5:30
विराट आणि प्रीती झिंटा यांच्या भेटीचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामना संपताच विराटने प्रीतीला फोनमध्ये काय दाखवलं? 'डिंपल गर्ल'च्या एक्सप्रेशनने वेधलं लक्ष
Virat Kohli With Preity Zinta: आयपीएल २०२५ आता रंगतदार वळणावर आलं आहे. गेल्या रविवारी संध्याकाळी आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings Vs Royal Challengers Bengaluru) यांच्यात सामना झाला. सामन्यानंतर पंजाब किंग्सची मालकीन प्रीती झिंटा आणि आरसीबी क्रिकेटर विराट कोहली यांची भेट झाली. यावेळी विराटनं प्रीतीला फोनमधील काही फोटो दाखवले, ज्यावर प्रीतीनं दिलेल्या एक्सप्रेशनने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. विराटने दाखवलेले फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. आता विराट आणि प्रीती झिंटा यांच्या भेटीचा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोहालीच्या मुल्लानपूर येथील नव्याने बांधलेल्या महाराजा यादविंद्र सिंग क्रिकेट स्टेडियममध्ये आरसीबीने यजमान पंजाब किंग्जचा ७ विकेट्सने पराभव केला. सामन्यानंतर, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा समोरासमोर आले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, कोहली प्रीतीला भेटतो, तिच्याशी हस्तांदोलन करतो आणि गप्पा मारु लागतो. यावेळी विराटनं त्याच्या फोनवरून प्रीतीला काही फोटो दाखवतो. फोटो पाहून प्रीतीच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. विराटनं तिला फोनवर त्याची मुलं वामिका आणि अकाय यांचे फोटो दाखवल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधलाय.
Virat Kohli with Preity Zinta❤️🎀#ViratKohlipic.twitter.com/WGRiA9MZNo
— Avinash (@AVI__VK_18) April 21, 2025
दरम्यान याच सामन्यात, विराट कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या शानदार खेळीने विराट कोहलीने डेव्हिड वॉर्नरचा मोठा विक्रम मोडला, तो आता आयपीएलमध्ये ५० पेक्षा जास्त धावांच्या सर्वाधिक खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. दरम्यान, डिसेंबर २०१७ मध्ये विराट कोहलीने अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केलं होतं. जानेवारी २०११ मध्ये अनुष्काने मुलगी वामिकाला तर गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी रोजी अनुष्काने मुलगा अकाय याला जन्म दिला. विराटचं आपली पत्नी आणि मुलांवर प्रचंड प्रेम आहे.