Good News!! प्रीती झिंटा झाली आई, वयाच्या 46 व्या वर्षी झाली जुळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:30 PM2021-11-18T12:30:13+5:302021-11-18T12:33:47+5:30
Preity Zinta Becomes Mother of Twins : होय, प्रीती आई झालीये आणि तिचा पती जेन गुडइनफ बाबा झालाये. जुळ्या मुलांची नावं माहितीये?
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) वयाच्या 46 व्या वर्षी जुळ्या मुलांची आई झालीये. होय, प्रीती आई झालीये आणि तिचा पती जेन गुडइनफ बाबा झालाये. प्रीतीने सोशल मीडियावर ही गुड न्यूज शेअर केली आहे.
‘मी आज सर्वांना अत्यानंदाची बातमी देऊ इच्छिते. जेन आणि मी खूप आनंदी आहोत आणि आमची मनं कृतज्ञतेनं भरून आलंय. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचं कुटुंबात स्वागत करतोय,’ असे प्रीतीने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या मुलांची नावंसुद्धा सांगितली आहेत. जय आणि जिया अशी दोघांची नावं आहेत. सरोगसीच्या माध्यमातून जुळ्यांचा जन्म झाला आहे. यापैकी एक मुलगा आहे व एक मुलगी.
Hi everyone, I wanted to share our amazing news with all of you today. Gene & I are overjoyed & our hearts are filled with so much gratitude & with so much love as we welcome our twins Jai Zinta Goodenough & Gia Zinta Goodenough into our family. pic.twitter.com/wknLAJd1bL
— Preity G Zinta (@realpreityzinta) November 18, 2021
‘आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघं खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणा-या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मन:पूर्वक आभार,' असं तिने पुढे लिहिलं आहे.
पाच वर्षांपूर्वी प्रीतीने तिच्यापेक्षा 10 वर्षे लहान अमेरिकन बॉयफ्रेन्ड जेन गुडइनफसोबत लग्नगाठ बांधली होती. 29 फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजिलिसमध्ये दोघांनीही हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नाची बातमी प्रीतीने अनेक महिने लपवून ठेवली होती. सुमारे 6 महिन्यानंतर या लग्नाचे फोटो समोर आले होते. प्रीती व जेन दोघेही सध्या अमेरिकेत राहतात. जेन पेशाने फायनान्शिअल अॅनालिस्ट आहे.
प्रीतीच्या करिअरबद्दल सांगायचं तर तिने 1998 मध्ये मणी रत्नम दिग्दर्शित ‘दिल से’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिने कल हो ना हो, वीर झारा, कभी अलविदा ना कहना, क्या कहना, संघर्ष, दिल चाहता है, लक्ष्य यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.