Preity Zinta Birthday : चुलबुल्या प्रिती झिंटाच्या ८ बेस्ट चित्रपटातील ‘या’ अदा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2017 07:11 AM2017-01-31T07:11:42+5:302017-01-31T12:43:45+5:30
‘डिंपल गर्ल’ आणि ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर अनेक उत्कृष्ट ...
‘ िंपल गर्ल’ आणि ‘बबली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिती झिंटा हिने दमदार अभिनय आणि परफॉर्मन्सच्या आधारावर अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या गालावरच्या खळीचे तर लाखो दिवाने आहेत. तिच्या चुलबुल्या अभिनयाने तिने सुरूवातीच्या दोनच चित्रपटांमध्ये सर्व चाहत्यांना आपलेसे करून घेतले. मागील वर्षी ती तिचा बॉयफ्रेंड जेने गुडनग याच्यासोबत विवाहबद्ध झाली. आज तिचा ४२ वा वाढदिवस असून पाहूयात कोणते तिचे ८ बेस्ट चित्रपट आहेत ते....
‘दिल से’ :
१९९८ मध्ये मनी रत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून अभिनेत्री प्रिती झिंटा हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. शेखर कपूर यांनी तिचे नाव सुचवले होते. तिची या चित्रपटातील भूमिका अत्यंत लहान होती. मात्र, मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनिषा कोईरालापेक्षा प्रितीचीच भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडली. तिचे व्यक्तीमत्त्व आणि सौंदर्याचे सर्व दिवाने झाले.
‘संघर्ष’ :
१९९९ मध्ये प्रितीचा ‘संघर्ष’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने साकारलेली सीबीआय आॅफिसरची भूमिका लक्षवेधी ठरली. या आॅफिसरचे एका कैद्यासोबतच प्रेम जुळते. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खुप कौतुक करण्यात आले. करिअरच्या दुसऱ्याच चित्रपटात तिने सीबीआय आॅफिसरसारखी आव्हानात्मक भूमिका स्विकारली.
‘क्या कहना’ :
२००० मध्ये रिलीज झालेल्या ‘क्या कहना’ चित्रपटाचे कथानक कोण विसरू शकेल? या चित्रपटात ती लग्नाच्या अगोदरच आई बनते. ‘कुंवारी माता’ भोवती फिरणाऱ्या कथानकाला सुरूवातीला प्रचंड विरोध झाला. मात्र, उमेदीच्या काळात एवढे मोठे आव्हान स्विकारणे यातच प्रितीचे खरे सामर्थ्य असल्याचे कळतेय.
‘मिशन कश्मीर’ :
प्रिती झिंटाच्या करिअरमध्ये तिची ट्यूनिंग अभिनेता हृतिक रोशन याच्यासोबत जास्त जमली. २००० मध्ये तिने पहिल्यांदा ‘मिशन कश्मीर’ या चित्रपटात त्याच्यासोबत काम केले. त्या दोघांची जोडी सर्वांना खुप आवडली. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसू लागले. या चित्रपटात तिने टीव्ही रिपोर्टरची भूमिका साकारली आहे.
‘दिल चाहता हैं’ :
बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी प्रितीला ‘दिल चाहता हैं’ च्या माध्यमातून मिळाली. त्यावेळी युवापिढीमध्ये या चित्रपटाची बरीच प्रशंसा झाली. या चित्रपटातील प्रितीच्या लुकची सर्वत्र चर्चा झाली.
‘कोई मिल गया’ :
२००३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कोई मिल गया’ हा चित्रपट तिच्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये बॉक्स आॅफिसवर सर्वांत जास्त कमाई करणारा ठरला. या चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी प्रितीला ‘फिल्मफेयर अॅवॉर्ड’ चा बेस्ट अॅक्ट्रेस अॅवॉर्ड साठी नॉमिनेट करण्यात आले होते.
‘कल हो ना हो’ :
२००३ मध्ये रिलीज झालेला ‘कल हो ना हो’ हा तिचा दुसरा जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटातील नैनाची भूमिका लक्षवेधी ठरली. शाहरूख खानसोबतची तिची भूमिका बॉलिवूडमध्ये आजही चर्चिली जाते.