"मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं...", प्रिती झिंटाने उलगडला तो अवघड काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:58 AM2024-09-04T09:58:49+5:302024-09-04T09:59:23+5:30

एका मुलाखतीत प्रितीने तिच्या आयुष्यातील अवघड काळ उलगडला.

Preity Zinta opens up about IVF journey before conceiving surrogacy | "मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं...", प्रिती झिंटाने उलगडला तो अवघड काळ

"मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं...", प्रिती झिंटाने उलगडला तो अवघड काळ

बॉलिवूडची 'डिंपल गर्ल' प्रिती झिंटा (Preity Zinta) ही कायमच चर्चेत असते. आयपीएल असो किंवा किंवा सोशल मीडिया तिची जादू सगळीकडे पाहायला मिळते.  'डिंपल गर्ल' आज एक यशस्वी अभिनेत्री आणि बिझनेस वुमन असली तरी प्रितीला तिच्या वैयक्तीक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत प्रितीने तिच्या आयुष्यातील अवघड काळ उलगडला.

प्रीती २०१६ साली जीन गुडइनफबरोबर लग्नबंधनात अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर प्रीती झिंटा 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई झाली. जय व जिया अशी त्यांच्या मुलांची नावं ठेवण्यात आली. मात्र, सरोगसीचा मार्ग निवडण्यापूर्वी तिने आयव्हीएफचाही प्रयत्न केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रीती व्यक्त झाली.


 'वोग इंडिया'शी बोलताना प्रिती म्हणाली की, "माझ्याही आयुष्यातही खूप वाईट दिवस पाहिले आहेत. वाईट काळात खुश राहणं आणि भाग्यवान असणं हा एक मोठा संघर्ष असतो. मला माझ्या आयव्हीएफ दरम्यान झालेल्या त्रासावेळी हे सगळं जाणवलं होतं. प्रत्येक वेळी मला चेहऱ्यावर हास्य ठेवणं आणि चांगलं वागणं खूप कठीण होतं. कधी कधी तर मला भिंतीवर डोकं आपटून रडावसं वाटायचं. मला कोणाशीही बोलावसं वाटायचं नाही. त्यावेळी मला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला होता". 


प्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'लाहोर 1947' मधून कमबॅक करत आहे.  'लाहोर 1947' सिनेमात प्रिती मुख्य भूमिकेत आहे. तर सनी देओल मुख्य अभिनेता आहे. यामुळे प्रिती आणि सनीची जोडी अनेक वर्षांनी पुन्हा बघायला मिळणार आहे. प्रितीला इतक्या वर्षांनी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 
 

Web Title: Preity Zinta opens up about IVF journey before conceiving surrogacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.