Preity Zinta : एका घटनेने उद्ध्वस्त झालं प्रिती झिंटाचं आयुष्य; अडचणीत गेले दिवस, मार्ग बदलला अन् झाली करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 03:20 PM2023-06-11T15:20:21+5:302023-06-11T15:48:03+5:30
Preity Zinta : प्रीतीची कारकीर्द यशस्वी झाली असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच चढ-उतार आले आहेत.
बॉलिवूडची बबली गर्ल प्रिती झिंटा नेहमीच हसताना दिसत असेल, पण सत्य हे आहे की ती खरोखर एक फायटर आहे. लहान वयात तिने वैयक्तिक आयुष्यात जे काही पाहिलं आणि भोगलं हे खूप दु:खाचं होतं. प्रिती झिंटाने 1998 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. 25 वर्षांपूर्वी प्रीतीने शाहरुख खानसोबत 'दिल से' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर प्रीतीने बॉलिवूडला सातत्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 'सैनिक', 'क्या कहना', 'कल हो ना हो', 'सलाम नमस्ते', 'वीर जरा', 'संघर्ष' हे त्यांचे सर्वाधिक हिट आणि लोकप्रिय चित्रपट आहेत.
प्रीतीची कारकीर्द यशस्वी झाली असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमीच चढ-उतार आले आहेत. आपल्या हसण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रिती झिंटाने वयाच्या 13 व्या वर्षी वडिलांना कायमचं गमावलं. तिचे वडील दुर्गानंद झिंटा यांचे कार अपघातात निधन झाले. त्यादरम्यान आई नीलप्रभा याही कार अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. तिची आई दोन वर्षे अंथरुणाला खिळून राहिली. प्रीती 15 वर्षांची झाली तेव्हा तिची आईही गेली. अशा परिस्थितीत प्रीती खूप एकटी पडली होती.
प्रिती झिंटा जेव्हा काही करायचे ठरवतं तेव्हा ती नक्कीच करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रीती झिंटाची कारकिर्द उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आली जेव्हा तिने बॉलीवूड निर्माता भरत शाह आणि अंडरवर्ल्डमधील इतर लोकांविरोधात वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. प्रितीच्या या वक्तव्यानंतर भरत शाह दोषी सिद्ध झाले. त्याचवेळी अंडरवर्ल्डनेही हळूहळू फिल्म इंडस्ट्रीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली, पण त्यानंतर प्रितीची कारकिर्दीला धोका निर्माण झाला.
प्रीती झिंटा आज चित्रपटांपासून दूर असली तरी ती कोटयवधींची कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रीती झिंटाची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच 110 कोटी रुपये आहे. प्रीती आता दोन मुलांची आई आहे. 2016 मध्ये तिने परदेशी जेन गुडनाइफशी लग्न केलं होतं. प्रीती एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे. याशिवाय तिने ऋषिकेशच्या अनाथाश्रमातील 34 मुलींनाही दत्तक घेतलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.