अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 11:37 IST2025-01-31T11:37:10+5:302025-01-31T11:37:38+5:30
सिनेइंडस्ट्रीपासून ती नेमकी का दूर गेली याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अचानक इंडस्ट्रीतून गायब का झालेली प्रिती झिंटा? म्हणाली, "अभिनेत्री असले तरी एक महिला..."
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. 'कल हो ना हो','सोल्जर','हिरो','दिल से' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र काही वर्षांपूर्वी प्रितीने सिनेमांमधून ब्रेक घेतला. बॉयफ्रेंडसोबत लग्न करुन ती परदेशात स्थायिक झाली. नंतर सरोगसीद्वारे तिला जुळी मुलंही झाली. सिनेइंडस्ट्रीपासून ती नेमकी का दूर गेली याचं कारण तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
एका मुलाखतीत प्रिती म्हणाली होती की,"मला सिनेमांमध्ये काम करायचं नव्हतं. मला बिझनेसवर लक्ष द्यायचं होतं. वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्यायचं होतं. अभिनेत्री असले तरी मी एक महिला आहे. महिलांना एक बायोलॉजिकल वॉच असतं. मी इंडस्ट्रीत कधीच कोणाला डेट केलं नाही. पण मलाही कुटुंब हवं होतं. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका साकारणं चांगलं आहे पण आपलं खरं आयुष्यही तितकंच छान जगलं पाहिजे. म्हणून मला लग्न करायचं होतं, मूलं हवी होती. तसंच मी माझ्या बिझनेससाठीही खूप उत्साहित होते. वैयक्तिक आयुष्यावर मला जास्त लक्ष केंद्रित करायचं होतं."
ती पुढे म्हणाली, "जो तो मला हेच सांगत होता की तू बस मिस करशील, ट्रक, ट्रेन मिस करशील. माझं सांगणं होतं की हो ठीक आहे. आता मी त्याबद्दल विचार करुन हसते. प्रत्येक जण समान अधिकारांवर बोलतो, महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायतं असतं. पण आपल्याला निसर्गाने बायोलॉजिकल वॉचही दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटी सेट कराव्या लागतात."
प्रिती झिंटाने २०१६ साली अमेरिकेतील फायनान्स अॅनालिस्ट जीन गुडइनफसोबत लग्न केलं. पाच वर्षांनंतर तिला सरोगसीच्या माध्यमातून जुळी मुलं झाली. त्यांचं नाव जय आणि जिया असं आहे. आता प्रितीने इंडस्ट्रीत कमबॅक केलं आहे. सनी देओलसोबत ती 'लाहोर १९४७' मध्ये दिसणार आहे.