वयाच्या १५व्या वर्षी बनला सुपरस्टार, करिश्मासोबत केलं दमदार पदार्पण, एका अपघातामुळे संपलं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 17:43 IST2023-12-13T17:38:40+5:302023-12-13T17:43:23+5:30
बॉलिवूडमध्ये त्याने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम सुरू केलं होतं आणि 15 वर्षाचा होईपर्यंत तो एक स्टार बनला होता.

वयाच्या १५व्या वर्षी बनला सुपरस्टार, करिश्मासोबत केलं दमदार पदार्पण, एका अपघातामुळे संपलं करिअर
प्रसिद्ध अभिनेता हरिश कुमारने बॉलिवूडमध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम सुरू केलं होतं आणि 15 वर्षाचा होईपर्यंत तो एक स्टार बनला होता. पण त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे तो बॉलिवूडमधून अचानक गायब झाला.
साउथ सिनेमा आणि नंतर बॉलिवूडमधील एक मोठं नाव हरीशला ओळख तेलुगु सिनेमा 'प्रेमा खैदी’ (Prema Khaidi) च्या रिलीजनंतर मिळाली होती. या सिनेमाच्या यशाने हरीशला रातोरात स्टार बनवलं होतं. नंतर हा 'प्रेमा कैदी’ हिंदीतही बनवण्यात आला होता. त्याचं नाव होतं ‘प्रेम कैदी’ (Prem Qaidi). 1991 मध्ये आलेल्या या सिनेमातून करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हरीशबाबत सांगायचं तर त्याने अनेक सिनेमात काम केलं. ज्यात ‘तिरंगा’ आणि ‘कुली नंबर 1’ सिनेमांचाही समावेश आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरीश जेव्हा त्याच्या करिअरच्या शिखरावर होता तेव्हा त्याला एका जुन्या जखमेने त्रास देणं सुरू केलं होतं. हरीशला बालपणी पाठीच्या मणक्याला जखम झाली होती. ते दुखणं पुन्हा सुरू झालं होतं आणि यामुळे त्याला स्लिप डिस्कची समस्या झाली होती. डॉक्टरांनी हरीशला 2 वर्ष आराम करण्याचा सल्ला दिला होता. आणि असं म्हणतात की, यादरम्यान हरीशचं वजन खूप वाढलं होतं. बरा झाल्यानंतर हरीशने 'नॉटी एट 40' आणि 'चार दिन की चांदनी' सारख्या सिनेमातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता, पण यात त्याला फार काही यश मिळालं नाही.