"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:36 IST2025-02-21T13:35:58+5:302025-02-21T13:36:33+5:30
chhaava Movie : सध्या सर्वत्र 'छावा' चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहेत. अशात या चित्रपटातील कलाकार सिनेमासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

"युद्धा अगोदरची तयारी!", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'मधील युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) २०२५ वर्षातील सर्वात दमदार कमाई करणारा सिनेमा बनला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून बंपर कमाई केली आहे. ७ दिवसात या सिनेमाने २०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात बऱ्याच मराठी कलाकारांनी काम केले आहे. यात अभिनेता संतोष जुवेकरचाही समावेश आहे. त्याने 'छावा' सिनेमात रायाजी मालगे ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून अभिनेता भारावून गेला आहे. दरम्यान त्याने सोशल मीडियावर छावा चित्रपटातील युद्धाच्या सीनच्या सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहेत. अशात या चित्रपटातील कलाकार सिनेमासंदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. चित्रपटात शेवटी दाखवलेल्या दमदार युद्धाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान अभिनेता संतोष जुवेकरने या युद्धाच्या सरावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, युद्धा अगोदरची तयारी!!! जय भवानी. जय शिवराय. जय शंभूराजे. यात संतोष जुवेकर तलवारीने औरंगजेबच्या सैन्यासोबत लढताना दिसतो आहे. तसेच या व्हिडीओत विकी कौशलदेखील युद्धाच्या सीनचा सराव करताना दिसतो आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
एका युजरने या व्हिडीओवर लिहिले की, संतोष जुवेकर आमचा लाडका संत्या भाई. खूप छान वाटतंय की आमचा भाऊ छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटात इतकी मोठी भूमिका रायाजी यांची करतोय बघून खूप समाधान वाटतंय आमच्या भाई ला देव अशीच मोठी प्रगती करण्यासाठी बळ देवो हेच मागणं आहे लव्ह यू संत्या भाई. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, माझा आवडता मराठी नायक.. संत्या भाई आणि गर्व हां आहे की महत्वपूर्ण रायाजीची भूमिका केली.. त्याबद्द्ल भाई खूप छान अप्रतिम. जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे. आणखी एका युजरने लिहिले की, अप्रतिम काम केलंय... अत्यंत आवडता अभिनेता आहेस तू. असंच छान काम करत रहा. बऱ्याच युजर्सनी टाळ्यांच्या आणि हार्टच्या इमोजी शेअर केल्या आहेत.