कंगना अमेरिकेत करतेयं ‘सिमरन’ची तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2016 12:40 PM2016-08-28T12:40:55+5:302016-08-28T18:10:55+5:30
बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत सध्या अमेरिकेत आहे. नाही...नाही... हॉलीडेसाठी नाही तर ‘सिमरन’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी. होय, कंगना ...
ब लिवूडची ‘क्वीन’ कंगना राणौत सध्या अमेरिकेत आहे. नाही...नाही... हॉलीडेसाठी नाही तर ‘सिमरन’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीसाठी. होय, कंगना सध्या या चित्रपटातील भूमिकेची तयारी करतेय. हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटात कंगना हाऊस कीपिंग स्टाफच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगना यात प्रफुल पटेल नामक गुजराती अनिवासी भारतीय मुलीची भूमिका साकारणार आहे. हंसल यांनी चित्रपटाच्या टीमसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. कंगना याच कार्यशाळेत हॉटेल स्टाफकडून प्रशिक्षण घेत आहे. कंगनाची बहीण रंगोली तिने या वर्कशॉपचे काही फोटो टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहेत. गत २४ आॅगस्टला कंगना अमेरिकेला रवाना झाली होती. १ सप्टेंबरला ती मुंबईत परतणार आहे. ‘सिमरन’ हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी मुलीची कथा आहे. सप्टेंबरच्या अखेरिस चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. आता कंगना इतकी भारी तयारी करतेयं, म्हटल्यावर तिच्या प्रयत्नांना यश येणार, ही अपेक्षा करूयांत!!
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
{{{{twitter_post_id####
}}}}Workshop mode!! #Simran#Atlantapic.twitter.com/8m8nIrZWqc— Rangoli Chandel (@Rangoli_A) 27 August 2016
{{{{twitter_post_id####
}}}}Workshop mode!!! #Discussion#Simran#Atlantapic.twitter.com/zsPdFrbTQF— Rangoli Chandel (@Rangoli_A) 27 August 2016