जयपूरमध्ये दिग्गजांच्या मैफिलीत रंगले इंडिया म्युझिक समीट 2018
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 15:24 IST2018-10-15T15:16:20+5:302018-10-15T15:24:54+5:30
इंडिया म्युझिक समीट 2018 नुकतेच जयपूरमध्ये पार पडले. या तीन दिवसांत अनेक कलाकारांनी आपली कला याठिकाणी सादर केली.

जयपूरमध्ये दिग्गजांच्या मैफिलीत रंगले इंडिया म्युझिक समीट 2018
इंडिया म्युझिक समीट 2018 नुकतेच जयपूरमध्ये पार पडले. या तीन दिवसांत संगीत श्रेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला याठिकाणी सादर केली. तीन दिवस चाललेले हे म्युझिकल समीट रसिकांसाठी पर्वणीच ठरली. या समीटमध्ये गायक हरिहरन, सुरेश वा़डकर, शंकर महादेवन, उषा उथ्युप, गीतकार प्रसून जोशी, व्हॉयलिन वादक एल. सुब्रमण्यम आणि रॉबिन बार्न्स या कलाकारांनी आपली कला सादर केली. या म्युझिकल समीटला रसिकांनी देखील भरभरुन प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्धाटन दिग्गजांच्या उपस्थित पार पडले.
आपल्या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध करताना गायक हरिहरन
उषा उथ्युप आपली कला सादर करताना
जॅझ सिंगर रॉबिन बार्न्सचे स्वर आणि एल. सुब्रमणयम यांच्या व्हॉयलिनने उपस्थितांची मनं जिंकली
शुजात खान सतार वाजवताना