‘हा’ बायोपिक बघून राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डोळ्यात तरळले अश्रू!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2017 03:44 PM2017-03-28T15:44:02+5:302017-03-29T04:37:21+5:30

भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नुकताच एक ‘बायोपिक’ चित्रपट दाखविण्यात आला. जो बघून ते बराच वेळ शांत राहिले अन् ...

President of Pranab Mukherjee's eyes tears of 'this' biopic! | ‘हा’ बायोपिक बघून राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डोळ्यात तरळले अश्रू!

‘हा’ बायोपिक बघून राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या डोळ्यात तरळले अश्रू!

googlenewsNext
रताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नुकताच एक ‘बायोपिक’ चित्रपट दाखविण्यात आला. जो बघून ते बराच वेळ शांत राहिले अन् त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत असल्याचे दिसून आले. होय, त्यांना अभिनेता राहुल बोस याने एका १३ वर्षांच्या चिमुरडीवर तयार करण्यात आलेला बायोपिक जेव्हा दाखविण्यात आला, तेव्हा त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

‘पूर्णा मालावत’ हे नाव तुम्ही एकले असेलच. जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. केवळ १३ वर्षांच्या पूर्णा मालावतने माउंट एव्हरेस्ट सर करीत, सर्वाधिक कमी वयाच्या मुलीने केलेला हा विक्रम म्हणून तिच्या नावावर नोंदविला गेला. वास्तविक पूर्णाची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक असल्याने तिला एव्हरेस्टपर्यंतचा प्रवास खूपच खडतर परिस्थितीत सर करावा लागला. तिच्या या जिद्दीची कथा अभिनेता राहुल बोस याने पडद्यावर साकारली. 



चित्रपट पूर्ण होताच राहुल याने सर्वप्रथम देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी राष्ट्रपती भवन येथेच स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले. चित्रपट बघण्यासाठी राष्टÑपतींसमवेत अनेक नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर पूर्णा हिचा संपूर्ण परिवारही यावेळी उपस्थित होता. चित्रपट संपताच राष्ट्रपती भवनातील वातावरण अतिशय भावूक झाले होते. कारण प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले होते. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या बायोपिकविषयी गौरोद्गार काढताना पूर्णाची कथा पडद्यावर साकारल्याने आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच या बायोपिकमुळे महिला सशक्तीकरणास पाठबळ मिळेल अन् जगातील प्रत्येक महिलेला तिचे स्वप्न साकार करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले. 

तर बायोपिकचा कर्ताधर्ता राहुल बोसने सांगितले की, चित्रपट बघून राष्टÑपतींच्या डोळ्यात अश्रू आलेत हे मी तुम्हाला सांगणार नाही, तर त्यांनी आमच्यासोबत चित्रपटाबाबत बराच वेळ चर्चा केली व चित्रपटाविषयी चांगली प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुलने असेही म्हटले की, मला खात्री आहे की जो कोणी हा चित्रपट बघणार त्याच्या डोळ्यात अश्रू येतील, जर असे घडले नाही तर मी पैसे परत देईल, असेही राहुल म्हणाला. हा चित्रपट ३१ मार्च रोजी रिलीज होणार असून, पूर्णाची भूमिका आदिती इनामदार हिने साकारली आहे. राहुल बोसदेखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. 

Web Title: President of Pranab Mukherjee's eyes tears of 'this' biopic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.