अक्षयकुमारच्या ‘या’ चित्रपटाचे नाव ऐकून पंतप्रधान मोदींना आले हसायला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2017 04:06 PM2017-05-09T16:06:30+5:302017-05-09T21:37:11+5:30

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अक्षयकुमार याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो अक्षयने शेअर केला ...

Prime Minister Modi laughs at the name of Akshay Kumar's 'This' film | अक्षयकुमारच्या ‘या’ चित्रपटाचे नाव ऐकून पंतप्रधान मोदींना आले हसायला!!

अक्षयकुमारच्या ‘या’ चित्रपटाचे नाव ऐकून पंतप्रधान मोदींना आले हसायला!!

googlenewsNext
ष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अक्षयकुमार याने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचा एक फोटो अक्षयने शेअर केला असून, कॅप्शनमध्ये लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, त्यांना लवकरच रिलीज होणाºया ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाविषयीच्या काही गोष्टी सांगण्याची संधी मिळाली. चित्रपटाचे टायटल ऐकून त्यांच्या चेहºयावर फुललेल्या हास्यामुळे मी भारावून गेलो.’ अक्षयकुमार त्याच्या या चित्रपटाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानासाठी सक्रिय होऊ इच्छितो. }}}} ">Met PM @narendramodi and got the opportunity to tell him about my upcoming 'Toilet-Ek Prem Katha.' His smile at just the title made my day! pic.twitter.com/qbvYrlbM2Y— Akshay Kumar (@akshaykumar) May 9, 2017अक्षयकुमारच्या अगोदर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून अक्षयसोबतच्या भेटीमुळे आनंद झाल्याचे म्हटले. शिवाय त्याच्या ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या. आता प्रधानमंत्री स्वत:च ट्विटवरून कौतुक करीत असतील तर मग अक्षय कसा मागे राहील. त्यानेही एक पाउल पुढे टाकत प्रधानमंत्र्यांचे आभार व्यक्त करीत हे माझे भाग्य असल्याचे म्हटले.  }}}} ">Happy to have met. My best wishes. https://t.co/BViBAnEdq9— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2017अक्षयकुमार लवकरच अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्यासोबत ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट शौचालयासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाशझोत टाकणारा असून, चित्रपटातून याविषयी जनजागृती केली जाणार आहे. प्रेमकथेच्या माध्यमातून ही जनजागृती केली गेल्याने प्रेक्षकांवर हा चित्रपट कितपत प्रभाव टाकेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

काही दिवसांपूर्वीच अक्षयने सहा मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट करून त्यामध्ये लिहिले होते की, ‘हीच वेळ आहे आपले विचार अन् शौचालय बदलण्याची.’ दरम्यान ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीनारायण सिंग यांनी केले आहे. हा चित्रपट ११ आॅगस्ट रोजी रिलीज केला जाणार आहे. 

Web Title: Prime Minister Modi laughs at the name of Akshay Kumar's 'This' film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.