"त्यांच्या गझल थेट आत्म्याशी संवाद साधत होत्या..."; पंकज उधास यांच्या निधनाने पंतप्रधान मोदी शोकाकुल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 06:58 PM2024-02-26T18:58:17+5:302024-02-26T19:01:29+5:30
पंतप्रधान मोदींनी भावूक पोस्ट करत पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहिली आहे (Pm Modi, Pankaj Udhas)
आज वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांचं निधन झालंय. पंकज यांच्या निधनाने संगीतविश्वात न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. सोनू निगम अन् इतर गायक आणि कलाकारांनी पंकज उधास यांना श्रद्धांजली वाहून दुःख व्यक्त केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकज उधास यांना भावूक शब्दांमध्ये श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान मोदींनी पंकज यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करुन पोस्ट लिहीलीय की, "पंकज उधासजी यांच्या निधनाबद्दल आम्ही शोक व्यक्त करतो, ज्यांच्या गायनाने अनेक भावना व्यक्त केल्या आणि ज्यांच्या गझल थेट आत्म्याशी भिडल्या. ते भारतीय संगीताचे दीपस्तंभ होते, ज्यांच्या सुरांनी अनेक पिढ्या ओलांडल्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांच्याशी झालेला माझा विविध संवाद आठवतो. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
We mourn the loss of Pankaj Udhas Ji, whose singing conveyed a range of emotions and whose Ghazals spoke directly to the soul. He was a beacon of Indian music, whose melodies transcended generations. I recall my various interactions with him over the years.
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2024
His departure leaves… pic.twitter.com/5xL6Y3Sv75
पंकज उधास यांनी आज वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांचं स्वादुपिंडाच्या कॅन्सरने दुःखद निधन झालं. पंकज यांना 'चिठ्ठी आयी है' गाण्याने अमाप लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी गायलेल्या गझल चाहत्यांच्या स्मरणात आहेत. पंकज यांना 'पद्मश्री' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं. पंकज यांच्या निधनाने संगीतविश्वातील एक तारा निखळल्याची भावना मनात आहे.