साउथच्या ‘या’ चित्रपटात बघावयास मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, टीजर झाला रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 12:55 PM2017-12-14T12:55:07+5:302017-12-14T18:25:07+5:30

साउथच्या चित्रपटात चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी झळकणार असून, नोटबंदीचाच मुद्दा घेऊन त्यांना दाखविण्यात येणार आहे.

Prime Minister Narendra Modi will be seen in South's 'This' film, teaser released! | साउथच्या ‘या’ चित्रपटात बघावयास मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, टीजर झाला रिलीज!

साउथच्या ‘या’ चित्रपटात बघावयास मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, टीजर झाला रिलीज!

googlenewsNext
उथचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता व्यंकट प्रभू यांच्या आगामी ‘पार्टी’ या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार असून, टीजरमध्ये तुफान अ‍ॅक्शन धमाका बघावयास मिळत आहे. राम्या कृष्णनन्, सत्यराज जय, नसीर यांसारख्या साउथमधील बड्या चेहºयांचा समावेश असून, हा एक मसालापट आहे. सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटाच्या एका सिनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बघावयास मिळणार आहेत. 

चित्रपटातील एका सीनमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदी संबंधातील एक व्हिडीओ दाखविला जाणार आहे. अर्थात हा व्हिडीओ एक सरप्रायजिंग मुद्दा असून, नोटबंदी जाहीर करतानाची व्हिडीओ क्लीप चित्रपटात दाखविली जाणार आहे. एका मिनिटांच्या या टीजरमध्ये चित्रपटाचा पूर्ण आशय जरी समजून येत नसला तरी, चित्रपट खूपच मनोरंजक असावा, यात शंका नाही. कारण टीजरमध्ये धमाकेदार अ‍ॅक्शनबरोबर काहीशी कॉमेडी आणि रोमान्सचे क्षणही दाखविण्यात येत आहेत. 



दरम्यान, केंद्र सरकारकडून नोटबंदी जाहीर केल्यानंतर हा मुद्दा सर्वसामान्यांबरोबरच चित्रपट निर्मात्यांनाही खुणावत आला आहे. यापूर्वीदेखील नोटबंदीचा उल्लेख काही चित्रपटांमध्ये करण्यात आला आहे. परंतु थेट पंतप्रधानांचा नोटबंदी जाहीर करतानाचा व्हिडीओ प्रथमच एखाद्या चित्रपटात दाखविला जात आहे. त्यामुळे यावर प्रतिक्रिया उमटण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती दिली जात असून, काही क्षणातच व्हिडीओला हजारोंच्या संख्येने हिट्स मिळाल्या आहेत. 

Web Title: Prime Minister Narendra Modi will be seen in South's 'This' film, teaser released!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.