दु:खद!! बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार प्रीतमच्या वडिलांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 02:20 PM2020-05-26T14:20:52+5:302020-05-26T14:23:06+5:30
बॉलिवूड सिंगर कैलाश खेर याने ही दु:खद बातमी शेअर केली आहे.
लॉकडाऊनदरम्यान बॉलिवूड जगतातून अनेक दु:खद बातम्या समोर येत आहेत. आता बॉलिवूड सिंगर कैलाश खेर याने एक दु:खद बातमी शेअर केली आहे. बॉलिवूडचा दिग्गज संगीतकार व गायक प्रीतम याचे वडील प्रबोध चक्रवर्ती यांचे निधन झाले.
सोमवारी प्रबोध चक्रवर्ती यांचे निधन झाले. कैलाश खेर याने त्यांच्या निधनाची बातमी शेअर केली. ‘माझ्या मित्राच्या वडिलांचे दु:खद निधन झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो ’, असे कैलाशने ट्विट केले.
धूम, ऐ दिल है मुश्किल, मेट्रो आणि बर्फी सारख्या चित्रपटांच्या गीतांना संगीत देणारा संगीतकार प्रीतम चक्रवर्ती उर्फ प्रीतम याला संगीताचा वारसा प्रीतमला घरातूनच मिळाला होता. प्रीतमचे वडील संगीताचे शिक्षक होते. अगदी नाममात्र मोबदल्यात ते विद्यार्थ्यांना संगीत शिकवत. प्रीतमही त्यांच्याकडूनच शिकला होता.
मेरे दोस्त के पिता जी देवलोक सिधार गए, दिवंगत आत्मा की सद्गति की मनोकामना. परिवार को ढाढ़स मिले यही प्रार्थना. प्रीतम मेरे भाई @ipritamofficial ईश्वर का मनन ही इस समय की ज़रूरत. ॐ नमो: शान्ति। हरि ॐ । pic.twitter.com/SsW9S9S8Rz
— Kailash Kher (@Kailashkher) May 25, 2020
चित्रपटात काम करण्यापूर्वी प्रीतमने सेंट्रो कार, थम्स अप, लिम्का, मॅकडोनाल्ड्स साठी जिंगल बनवलेत. पुढे प्रीतमला चित्रपटांत संधी मिळाली आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीच्या दिवसांत त्याने जीत गांगुलीसोबत काम केले. यानंतर ‘तेरे लिए’ या चित्रपटात प्रीतमला संगीतकार म्हणून संधी मिळाली. पुढे धूम, चॉकलेट, आंखे, वो लम्हे, अपना सपना मनी मनी अशा अनेक चित्रपटांना प्रीतमने संगीत दिले. 2007 मध्ये त्याने ‘लाइफ इन अ मेट्रो’ या चित्रपटाला संगीत दिले आणि त्याला एक नवी ओळख मिळाली. इंडस्ट्रीच्या लीडिंग फिल्म कंपोजर्सच्या यादीत त्याचे नाव सामील झाले,