अरिजित सिंगच्या या गाण्याला पूर्वा मंत्री सादर करणार तिच्या स्टाईलमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 07:31 AM2018-06-15T07:31:02+5:302018-06-15T13:01:02+5:30
तरुण गायिका पूर्वा मंत्री तिच्या अनेक हिट गाण्यांसाठी ओळखली जाते. तिने अजून एक रोमँटिक गाणे 'चन्ना मेरिया' गायले आहे. ...
त ुण गायिका पूर्वा मंत्री तिच्या अनेक हिट गाण्यांसाठी ओळखली जाते. तिने अजून एक रोमँटिक गाणे 'चन्ना मेरिया' गायले आहे. 'चन्ना मेरिया' हे मूळ अरिजित सिंग यांच्या गाण्याचे रेनडीशन आहे. या गाण्याविषयी पूर्वा सांगते, "मला हे गाणे अतिशय आवडले होते आणि मला ते पुन्हा तयार करायचं होते. गाणे गायच्यावेळी किंवा गाण्याच्या शूटिंगच्या वेळी मी खूपच सावध होते. कारण मला माझ्या गाण्यामध्ये मूळ गाण्याचा फिल तसाच राहावा असे वाटत होते. माझी स्पर्धा ही माझ्याच बरोबर आहे असेच मला नेहमी वाटते."
पूर्वाला असा विश्वास आहे की स्त्री ही बदल घडवू शकते आणि ती शक्ती आहे आणि म्हणून सर्व महिलांना तिने हे गाणे समर्पित केले आहे. पूर्वाला 'भारतीय शकीरा' म्हणून ओळखले जाते. विशाल-शेखर, मित ब्रदर्स, राहत फतेह अली खान, सोनू निगम आणि अशा अनेक दिग्गजांसोबत तिने आजवर स्टेज शेअर केला आहे. आजच्या पिढीतील ती एक आदर्श प्रतिभा म्हणून उदयास आली आहे. 'लत्थे दि चदर', 'कंगना: रीलोडेड', 'हाय मेरा दिल: रीलोडेड' या तिच्या गाण्यांना श्रोत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिचे 'उलझी', 'चार बंगडी' सारखे फोक फ्यूजन हे एक भव्य हिट होते आणि अजूनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राज्य करत आहे. तिने आजपर्यंत विविध शैलींमध्ये गाऊन तिचे अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे आणि तिच्या या जोखीम घेण्याच्या क्षमतेनेच ती या स्थानावर आज पोहोचली आहे.
पूर्वा मंत्रीने तिच्या करियरची सुरुवात ही एका रिअॅलिटी शो पासून केली आहे. इंडियन आयडल या कार्यक्रमात ती झळकली होती. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये तिने एकापेक्षा एक सरस गाणी सादर केली होती. त्यावेळी पूर्वा खूपच लहान होती. पण तिच्या आवाजाचे कौतुक सगळ्यांनीच केले होते. तिने काही मालिकांच्या शीर्षक गीतांना देखील आवाज दिला आहे. एका राजस्थानी मालिकेचे तिने शीर्षक गीत गायले होते. तसेच बालिका वधू या कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकेचे शीर्षक गीतदेखील तिनेच गायली होती. या शीर्षक गीताला प्रेक्षकांची खूपच चांगली पसंती मिळाली होती.