प्रिया बॅनर्जीच्या मंगळसूत्राचं सासू स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, प्रतीक बब्बरला सुचली कल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:15 IST2025-02-17T18:15:13+5:302025-02-17T18:15:30+5:30

प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत 'व्हॅलेंटाईन डे'ला लग्नगाठ बांधली.

Priya Banerjee s mangalsutra has a connection with her late mother-in-law smita patil prateik Babbar took the decision in memory of his mother | प्रिया बॅनर्जीच्या मंगळसूत्राचं सासू स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, प्रतीक बब्बरला सुचली कल्पना

प्रिया बॅनर्जीच्या मंगळसूत्राचं सासू स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, प्रतीक बब्बरला सुचली कल्पना

स्मिता पाटील (Smita Patil) या मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. १९८६ साली वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांचा मुलगा प्रतीक बब्बर (Prateik Babbar) फक्त १५ दिवसांचा असताना स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला. दोन दिवसांपूर्वीच प्रतीक बब्बरने दुसरं लग्न केलं. गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत (Priya Banerjee) त्याने आपली आई स्मिता पाटील यांच्या घरातच लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे त्याने प्रियाला घातलेल्या मंगळसूत्राचं स्मिता यांच्याशी खास कनेक्शन आहे.

प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत 'व्हॅलेंटाईन डे'ला लग्नगाठ बांधली. स्मिता पाटील यांच्या बांद्रा येथील घरीच दोघांनी जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या साक्षीने लग्न केलं. यावेळी प्रतीकचे वडील राज बब्बर आणि सावत्र भाऊ-बहीण मात्र दिसले नाहीत. घरात स्मिता पाटील यांची मोठी फोटोफ्रेम आहे त्यासमोर प्रतीक आणि प्रियाचे फोटो व्हायरल झाले. लग्नात प्रतीकने प्रियाला घातलेल्या मंगळसूत्राचं स्मिता पाटील यांच्याशी खास कनेक्शन आहे. फिल्मफेअर रिपोर्टनुसार, ते मंगळसूत्र स्मिता पाटील यांच्या एका दागिन्यापासून बनवलं आहे. जो दागिना त्या प्रतीकच्या जन्मानंतर घालणार होत्या. आईच्या स्मरणार्थ तिला आदरांजली म्हणून प्रतीकने त्या दागिन्याचा भाग मंगळसूत्रात वापरला आहे. 


प्रतीक आणि प्रियाने लग्नात ऑफ व्हाईट थीम ठेवली होती. रणबीर-आलियाच्या लग्नातील आऊटफिटप्रमाणेच त्यांचीही स्टाईल वाटत होती. प्रिया ऑफ रंगाच्या सुंदर लेहेंग्यात गोड दिसत होती. तर प्रतीकही त्याच रंगाच्या शेरवानीच हँडसम दिसत होता. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सर्वांनीच प्रतीकला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Priya Banerjee s mangalsutra has a connection with her late mother-in-law smita patil prateik Babbar took the decision in memory of his mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.