‘इंटरनेट सेन्सेशन’ प्रिया प्रकाशलाही आवडली राहुल गांधींची अदा! काय म्हणाली जरा वाचाच!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:59 PM2018-07-20T19:59:24+5:302018-07-20T20:02:42+5:30
भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाला आश्चर्याचा धक्का दिला. ते केवळ इथेच थांबले नाहीत तर मोदींची गळाभेट झाल्यानंतर ते लोकसभेत डोळा मारतानाही दिसते.
भर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेऊन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाला आश्चर्याचा धक्का दिला. ते केवळ इथेच थांबले नाहीत तर मोदींची गळाभेट झाल्यानंतर ते लोकसभेत डोळा मारतानाही दिसते. त्यांच राहुल यांच्या या वागण्यावर सध्या सोशल मीडियावर गलका सुरू आहे. विशेषत: राहुल यांच्या डोळ्या मारण्याच्या कृतीनंतर सगळ्यांनाच आठवते आहे, ती इंटरनेट सेन्सेशन प्रिया प्रकाश वारियर. काही महिन्यांपूर्वी प्रिया प्रकाश हिने असाच डोळा मारून अख्ख्या देशाला वेड लावले होते. ‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपमध्ये ती ‘नैन मटक्का’ करताना दिसली होती. या क्लिपनंतर प्रिया रातोरात स्टार बनली होती.
आता राहुल गांधींनी लोकसभेतील डोळा मारताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या विनोदी कमेंटचा पाऊस पडतोय.
@RahulGandhi#this is the best version of winking # priya prakash warrior. pic.twitter.com/vG6FjTuEJL
— Deepak Singh (@onceinabluenoon) July 20, 2018
‘राहुल यांनी तर प्रिया प्रकाशलाही मागे टाकले,’ असे बहुतांश युजर्सनी लिहिले आहे. विशेष म्हणजे, प्रिया प्रकाश हिलाही राहुल यांचे असे डोळा मारणे आवडले आहे.
I think Rahul Gandhi is truly inspired by Priya Prakash and Munna bhaii.. 🤗 #NoConfidenceMotion
— pratyasha#12 (@PratyashaPc) July 20, 2018
राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना डोळा मारला, ही बातमी पाहण्यासाठी मी कॉलेजमधून धावत घरी आले. हा खूपचं गोड क्षण होता. मी आनंदी आहे की, चित्रपटात माझा हा सिग्नेचर मूमेंट आहे. हा एक चांगला शिष्टाचार होता, असे ती म्हणाली.
लोकसभेत आज मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली.राहुल यांनी भाषणाचा समारोप केला. त्यानंतर ते थेट मोदींजवळ गेले आणि त्यांना मिठी मारली. हे सगळं भावनेच्या भरात होतंय, असंच सगळ्यांना वाटलं. पण, आपल्या जागेवर बसताना राहुल यांनी शेजारच्या सहकाऱ्यांकडे बघून डोळा मारला.