पुन्हा एकदा दिसला प्रिया प्रकाश वारियरचा घायाळ करणारा अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 10:15 PM2018-08-27T22:15:24+5:302018-08-27T22:15:52+5:30

यंदाची इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. तिचे लाखो चाहते एका लूकसाठी आतूर असतात.

priya prakash varrier traditional look in saree for onam | पुन्हा एकदा दिसला प्रिया प्रकाश वारियरचा घायाळ करणारा अंदाज!

पुन्हा एकदा दिसला प्रिया प्रकाश वारियरचा घायाळ करणारा अंदाज!

googlenewsNext

यंदाची इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. तिचे लाखो चाहते एका लूकसाठी आतूर असतात. अशातच मल्याळम सण ‘ओणम’निमित्त तिचा ट्रेडिशनल लूक समोर आला आहे. तिच्या या लूकने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले आहे.

प्रियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोत ती पांढ-्या रंगाच्या साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.‘ओरू अडार लव’ या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’रोमान्स करताना दिसली होती.  ती नेहमी सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असते. ती अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी प्रिया बॉलिवूडमध्ये यावी, अशीही चाहत्यांची इच्छा आहे.  
तूर्तास केरळ अस्मानी संकटाचा सामना करतेय, केरळ पूरग्रस्तांसाठी प्रिया प्रकाशने १ लाख रूपयांची मदत दिली आहे.  प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’ या    चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे. हा प्रियाचा डेब्यू सिनेमा आहे. 

Web Title: priya prakash varrier traditional look in saree for onam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.