निर्भया प्रकरणावर प्रियंका चोपडाने लिहिले भावनिक पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2017 10:01 AM2017-05-06T10:01:56+5:302017-05-06T15:32:08+5:30

१६ डिसेंबर २०१२ रोजीच्या रात्री दिल्ली येथे निर्भयासोबत घडलेल्या अतिशय दुर्दैवी अन् मानवीवृत्तीला काळिमा फासणाºया घटनेने संपूर्ण देश हादरला ...

Priyanka Chopard sent an emotional letter on the issue | निर्भया प्रकरणावर प्रियंका चोपडाने लिहिले भावनिक पत्र!

निर्भया प्रकरणावर प्रियंका चोपडाने लिहिले भावनिक पत्र!

googlenewsNext
डिसेंबर २०१२ रोजीच्या रात्री दिल्ली येथे निर्भयासोबत घडलेल्या अतिशय दुर्दैवी अन् मानवीवृत्तीला काळिमा फासणाºया घटनेने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेतील चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. बॉलिवूड कलाकारांनीदेखील या निर्णयाचे स्वागत करताना, सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने अतिशय इमोशनल संदेश शेअर करीत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
 
प्रियंकाने लिहिले की, ‘या निर्णयासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला; मात्र अखेर सत्याचाच विजय झाला. हा निर्णय शिकवण देणारा असून, मला माझ्या देशाच्या न्याय व्यवस्थेवर गर्व आहे.’ गेल्या पाच वर्षांपासून निर्भयाच्या परिवारासोबत संपूर्ण देश ताकदीने उभा आहे. सर्वांची एकच मागणी होती की, या सहा आरोपींना लवकरात लवकर फासावर चढविले जावे. आता न्यायालयाने निर्णय दिला असून, त्यांच्यावर कारवाई केव्हा केली जाईल याचीच प्रत्येकांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, प्रियंकाने आपल्या पत्रात लिहिले की, निर्भयाची लढाई सोपी नव्हती. ही एक अशी क्रांती होती, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. सगळ्यांनी एकजुटीने या नराधमांविरोधात आवाज उठविल्यानेच त्यांना त्याची शिक्षा मिळाली आहे. या लढाईत वर्किंग वुमन, विद्यार्थी, कामगार असे प्रत्येकजण सहभागी झाले होते. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या लढाईचा आज निर्णय लागला आहे. निर्भयाला आम्ही कधी विसरणार नाही. कारण हा एकट्या निर्भयाचा संघर्ष नव्हता तर प्रत्येक मुलीचा संघर्ष होता, असेही प्रियंकाने लिहिले. 

काही दिवसांपूर्वीच प्रियंका भारतात आली होती. यावेळी तिने तिच्या आगामी बॉलिवूड प्रोजेक्टवर चर्चा केली. त्याचबरोबर तिच्या आगामी ‘बेवॉच’ या पहिल्या हॉलिवूडपटांचे प्रमोशनही केले. प्रियंका लवकरच कल्पना चावलाच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अन् शूटिंगला सुरुवातही लवकरच केली जाणार आहे. 

Web Title: Priyanka Chopard sent an emotional letter on the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.