प्रियांका चोप्रा आणि निकला लवकरच हवीय 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 12:03 PM2018-10-02T12:03:46+5:302018-10-02T12:17:25+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने साधारण दोन महिन्यांपूर्वी साखरपुडा केला आहे, त्यानंतर सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे.

Priyanka Chopra and nick jonas wants this things soon | प्रियांका चोप्रा आणि निकला लवकरच हवीय 'ही' गोष्ट

प्रियांका चोप्रा आणि निकला लवकरच हवीय 'ही' गोष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहेप्रियांका आणि निक सध्या एकमेंकासोबत क्लॉलिटी टाईम स्पेंट करतायेत

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने साधारण दोन महिन्यांपूर्वी साखरपुडा केला आहे, त्यानंतर सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. अजूनपर्यंत दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार दोघे मुलांना घेऊन खूपच उत्सुक आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक नेहमी मुलांबाबत बोलत असतात त्यामुळे त्यांना लवकर लग्न करायचे आहे. दोघांच्यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री आहे आणि मुलांना घेऊन निक आणि प्रियांका एक्साइडेट आहेत. 


प्रियांका आणि निक सध्या एकमेंकासोबत क्लॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. ऐवढेच नाही तर दोघे सोशल मीडियावर आपले फोटोदेखील शेअर करत असतात. 
प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. आता हे लग्न किती ग्रँण्ड होईल, याची कल्पनाचं न केलेली बरी. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. 


सध्या निक भारतात आहे. प्रियांका तिच्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने सध्या तिचा मुक्काम भारतात आहे.  यात तिच्या अपोझिट फरहान अख्तर दिसणार आहे प्रियांकाला भेटण्यासाठी निकही भारतात आला आहे. 

Web Title: Priyanka Chopra and nick jonas wants this things soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.