लगीनघाई सुरू! पाहा,प्रियांका चोप्राच्या ब्राईडल शॉवर पार्टीचे खास फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 12:30 PM2018-10-29T12:30:54+5:302018-10-29T12:31:47+5:30
प्रियांका यावर्षीअखेरिस लग्नबंधनात अडकणार आहे आणि या लग्नाचे पारपंरिक विधी सुरू झाले आहेत. अलीकडे प्रियांकासाठी खास ब्राईडल शॉवर पार्टी आयोजित केली गेली.
ब्राईडल आयकॉन प्रियांका चोप्रा ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. हे लग्न संपूर्ण रितीरिवाजासह व्हावे, सामान्य मुलींप्रमाणे सगळी हौस-मौज भागवली जावी, अशी प्रियांकाची इच्छा आहे. ताजी खबर खरी मानाल तर प्रियांका यावर्षीच्या अखेरिस लग्नबंधनात अडकणार आहे आणि या लग्नाचे पारपंरिक विधी सुरू झाले आहेत. अलीकडे प्रियांकासाठी खास ब्राईडल शॉवर पार्टी आयोजित केली गेली.
न्यूयॉर्कमध्ये आयोजित या पार्टीला प्रियांका आणि निक जोनासचे सगळे मित्र हजर होते. यावेळी प्रियांकाने खास व्हाईट कलरचा गाऊन परिधान केला होता.
प्रियांकाची स्टाईलिश मिमिने सोशल मीडियावर या ब्राईडल शॉवर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. प्रियांकाचा फोटो शेअर करत, ‘हमारी दुल्हन’ असे मिमिने लिहिले आहे.
चर्चेनुसार, प्रियांका व निक जोनास याचवर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकू शकतात. जोधपूरमध्ये हा शाही विवाहसोहळा होईल, असेही कळतेय.प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात अद्याप लग्नाच्या तारखेचा खुलासा झालेला नाही. लवकरच या लग्नाच्या तारखेची घोषणा होईल, असेही मानले जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक जोधपूरमध्ये लग्न करणार आहेत. 30 नोव्हेंबरपासून 2 डिसेंबरपर्यंत लग्नाच्या वेगवेगळ्या विधी होणार आहेत. दोघे एका पॅलेसमध्ये वेडिंग करणार असल्याचे समजतेय. प्रियांका आणि निकने लग्नाच्या तयारीची जबाबदारी स्वत: घेतली आहे प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीत दोघे कटाक्षाने लक्ष घालता येत. प्रियांका- निकची ओळख गतवर्षी झालेल्या मेट गाला इव्हेंटमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री- झाली या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.