भारतात आली प्रियंका चोप्रा? पाहा लाडकी लेक मालतीबरोबरचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 01:16 PM2024-03-15T13:16:15+5:302024-03-15T13:19:26+5:30
देसीगर्ल मालतीला कडेवर घेऊन पापराझांनी पोज देताना दिसली.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काम आणि कुटुंब यांच्यात प्रियंका चांगला समतोल साधते. आई झाल्यानंतर प्रियंका आपलं पहिलं प्राधान्य मालतीला देते. तिच्या संगोपनात कोणतीही कमतरता जाणून देत नाही. कामातून ब्रेक मिळाला की ती तो वेळ मालतीसोबत घालवताना दिसते. विदेशात संसार थाटल्याने प्रियंकाचं मुंबईत येणं फार स्पेशल असतं. नुकतेच प्रियंका भारतात आली आहे.
प्रियंका ही लाडकी लेक मालती मेरीसह भारतात दाखल झाली आहे. नुकतंच प्रियंकाला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. प्रियंका सिंपल पण स्टायलिश अंदाजात दिसली. प्रियांका मुंबई विमानतळावर काळ्या रंगाच्या ट्राउजर आणि टॉपमध्ये दिसून आली. तर मालती ही हिरव्या रंगाचा प्रिंटेड ड्रेसमध्ये खूपच गोड दिसत होती. देसीगर्ल मालतीला कडेवर घेऊन पापराझांनी पोज देताना दिसली. यादरम्यानचे मायलेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेटकरी मालती मेरीच्या क्युटनेसवर फिदा झालेत.
प्रियंका भारतात काही कामानिमित्त आली आहे की कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याआधी जेव्हा प्रियंका भारतात आली होती. तेव्हा ती मुलगी मालतीला निक जोनासबरोबर परदेशात सोडून एकटीच मुंबईत आली होती. काही दिवसांपूर्वी जोनास ब्रदर्स त्यांच्या कॉन्सर्टसाठी मुंबईत आले होते, पण त्यावेळीही प्रियंका त्यांच्याबरोबर आली नव्हती. इतकेच नाही तर जामनगरमध्ये नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगलाही प्रियांका उपस्थित राहू शकली नाही. तसेच चुलत बहीण मीरा चोप्रा हिने १२ मार्च रोजी रक्षित केजरीवालशी लग्नगाठ बांधली, पण या लग्नातही प्रियंका उपस्थित नव्हती.
प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा जन्म 15 जानेवारी 2022 रोजी झाला होता. मालती आणि मेरी ही प्रियंकाची आई डॉ मधु चोप्रा आणि निकची आई डेनिस यांच्या आईंची नावे आहेत. यामधून प्रियंका आणि निकने अनोखा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे. तर प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला देश-विदेशातून अनेक पाहुणे आले होते.