अशी रंगली प्रियांका चोप्राची बॅचलर पार्टी! परिणीती, ईशा अंबानीही पोहोचल्या!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 10:20 AM2018-11-06T10:20:43+5:302018-11-06T10:21:19+5:30
प्रियांका चोप्रा लवकरच मिसेस निक जोनास होणार आहे. त्यापूर्वी पीसी सध्या आपले बॅचलर लाईफ एन्जॉय करतेय.
प्रियांका चोप्रा लवकरच मिसेस निक जोनास होणार आहे. त्यापूर्वी पीसी सध्या आपले बॅचलर लाईफ एन्जॉय करतेय. अद्याप प्रियांका व निक जोनासच्या लग्नाची तारीख जाहिर झालेली नाही. पण येत्या १ डिसेंबरला जोधपूरमध्ये प्रियांका व निक लग्नगाठ बांधणार, असे मानले जात आहे. सध्या मात्र प्रियांका आपल्या जवळच्या मैत्रिणींसोबत अॅम्स्टर्डममध्ये बॅचलरेट एन्जॉय करतेय. वेगवेगळ्या फ्रेन्ड सर्कलसोबत वेगवेगळी पार्टी करतेय.
अलीकडे प्रियांकाने तिचे हॉलिवूड फ्रेन्ड्स, चुलत बहीण परिणीती चोप्रा, ईशा अंबानीसोबत बॅचलरेट पार्टी केली. या सेलिब्रेशनचे फोटो परी व पीसीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या पार्टीत पीसीचे सगळे मित्र रेड कलरच्या आऊटफिटमध्ये आहेत तर ‘ब्राईड टू बी’ प्रियांका व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसतेय. तिचा स्टाईलिश अंदाज सगळ्यांनाच आवडला आहे. आपल्या नी-लेंथ व्हाईट ड्रेससोबत तिने फेदर जॅकेट कॅरी केले आहे.
तिच्या स्टाईलिश अंदाजासोबत तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही बघण्यासारखा आहे. यापूर्वी प्रियाकांची ब्राईडल शॉवर पार्टीही अशीच झक्कास रंगली होती. या पार्टीत प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि होणारी सासू डेनिस जोनास दोघी एकत्र दिसल्या होत्या.
निकसोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांका किती आनंदी आहे, याचा अंदाज या फोटोंवरून येते. प्राप्त माहितीनुसार, ३० नोव्हेंबरपासून प्रियांकाच्या लग्नाचे विधी सुरू होतील.
प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.आता हे लग्न किती ग्रँण्ड होईल, याची कल्पनाचं न केलेली बरी. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. ग