Priyanka Chopra Birthday: मी खूप नशीबवान! बायको प्रियांका चोप्रासाठी निक जोनसची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 11:17 IST2024-07-18T11:16:15+5:302024-07-18T11:17:31+5:30
प्रियांकाच्या वाढदिवशी पती निक जोनसने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Priyanka Chopra Birthday: मी खूप नशीबवान! बायको प्रियांका चोप्रासाठी निक जोनसची खास पोस्ट
अभिनयाने बॉलिवूडबरोबरच हॉलिवूड गाजवणाऱ्या देसी गर्ल प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस आहे. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून प्रियांकाने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलं. आज प्रियांका बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. प्रियांकाच्या वाढदिवशी पती निक जोनसने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
निक जोनसने बायको प्रियांकासाठी खास पोस्ट लिहिली आहे. प्रियांकाचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने स्वत:ला भाग्यवान म्हटलं आहे. "तू काय स्त्री आहेस...मी खूप भाग्यवान आहे. हॅपी बर्थडे माय लव्ह", असं कॅप्शन निक जोनसने पोस्टला दिलं आहे. निकच्या या फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट करत प्रियांकाला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियांकाने २००० साली मिस वर्ल्डचा खिताब नावावर करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. २००३ मध्ये द हिरो नावाच्या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर फॅशन, दोस्ताना, कमिने, ७ खून माफ, डॉन ३, अग्निपथ, मेरी कॉम, बर्फी, बाजीराव मस्तानी, क्रिश या सिनेमांमध्ये ती दिसली. बॉलिवूडबरोबरच प्रियांकाने हॉलिवूडही गाजवलं. बे वॉच, लव्ह अगेन, एंडिंग थिंग्ज या हॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
प्रियांका आणि निकने २०१८ साली लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. २०२२ साली सरोगसी पद्धतीने प्रियांका आणि निक एका मुलीचे आईवडील झाले. प्रियांकाने तिच्या लेकीचं नाव मालती ठेवलं आहे. अलिकडेच प्रियांका अनंत अंबानी -राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतात आली होती.