प्रियंका चोप्राच्या लग्नाला ६ वर्ष पूर्ण, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये दिसला नाही निक जोनस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 04:32 PM2024-12-03T16:32:10+5:302024-12-03T16:32:53+5:30
Priyanka Chopra Anniversary: प्रियंका चोप्राने ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. तिने हे सेलिब्रेशन मुलगी मालती मेरीसोबत केले आहे.
'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा ( Priyanka Chopra) आणि निक जोनस(Nick Jonas)च्या लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. मुलगी मालती मेरीसोबत त्यांनी अॅनिव्हर्सरी साजरी केली. या खास प्रसंगी 'देसी गर्ल'ने तिची लेक मालती मेरी चोप्रासोबत 'मोआना २' चित्रपट थिएटरमध्ये पाहिला, ज्याची एक झलक तिने सोशल मीडियावर दाखवली.
लग्नाच्या ६व्या वाढदिवसानिमित्त मालतीसोबत तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर पोस्ट शेअर करत, 'सिटाडेल' अभिनेत्री प्रियांका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले, "आमच्या अॅनिव्हर्सरीनिमित्त ही किती खास भेट आहे. मालतीचा आवडता 'मोआना' आमच्या मित्रपरिवारासह पाहणे विशेष होते. 'मोआना २' खूप मजेशीर आहे! उत्कृष्ट स्क्रीनिंगसाठी डिस्ने आणि डिस्ने ॲनिमेशनचे आभार. थिएटरमध्येही सर्व मुलांनी खूप छान वेळ घालवला. यासोबतच प्रियांकाने ती पोस्ट शेअर करत तिचा पती निक जोनासला टॅग केले आहे.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियंका चोप्रा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. पहिल्या फोटोत 'ग्लोबल स्टार' आरशाजवळ सेल्फी घेत आहे, तर दुसऱ्या फोटोत मालती थिएटरमध्ये लहान मुलांसोबत 'मोआना' पाहत आहे. हा फोटो त्याच्या मैत्रिणी अनिता चॅटर्जीने देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये निक देखील प्रियंका मालतीसोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये निक जोनास दिसत नव्हता.
राजस्थानमध्ये प्रियंका आणि निकने केलं लग्न
प्रियंका आणि निक यांचे राजस्थानमधील जोधपूर उम्मेद भवन पॅलेसमध्ये १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी शाही पद्धतीने लग्न झाले. या जोडप्याने ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनी लग्न केले. प्रियंका जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे एका मुलीची आई झाली. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव मालती मेरी चोप्रा जोनास ठेवले आहे.
वर्कफ्रंट
प्रियंकाकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. ॲक्शन-थ्रिलर 'सिटाडेल'नंतर प्रियंका लवकरच 'सिटाडेल २'मध्ये दिसणार आहे. या मालिकेत ग्लोबल स्टारसोबत हॉलिवूड अभिनेता रिचर्ड मॅडेनही दिसणार आहे. याशिवाय ती 'हेड्स ऑफ स्टेट' आणि 'द ब्लफ'मध्येही दिसणार आहे.