Video : ‘द स्काय इज पिंक’च्या प्रिमीअरमध्ये प्रियंका चोप्राला झाले अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 10:51 AM2019-09-15T10:51:09+5:302019-09-15T10:51:42+5:30

सध्या प्रियंका व फरहान अख्तर ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये असे काही झाले की, प्रियंकाला अश्रू अनावर झालेत.

priyanka chopra cried during the sky is pink premiere in toronto film festival | Video : ‘द स्काय इज पिंक’च्या प्रिमीअरमध्ये प्रियंका चोप्राला झाले अश्रू अनावर

Video : ‘द स्काय इज पिंक’च्या प्रिमीअरमध्ये प्रियंका चोप्राला झाले अश्रू अनावर

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियंका  खूप दिवसानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचा भाग बनणार आहे.

‘द स्काय इज पिंक’ या आगामी सिनेमाद्वारे प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे. प्रियंकाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या प्रियंका व फरहान अख्तर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. याचदरम्यान एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये असे काही झाले की, प्रियंकाला अश्रू अनावर झालेत.
नुकताच टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये ‘द स्काय इज पिंक’चे प्रीमिअर आयोजित केले गेले. यावेळी प्रियंका, फरहान, चित्रपटाची दिग्दर्शिका सोनाली बोस असे सगळे हजर होते. टोरंटो फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी ‘द स्काय इज पिंक’चे भरभरून कौतुक केले. अगदी  सर्वांनी उभे होऊन पाच मिनिटे टाळ्यांचा कडकडाट केला.

प्रियंकाचा अभिनय बघून अनेक लोक भावूक झाले होते. प्रियंकासाठीही हा क्षण भावूक होता. उपस्थितांचा हा प्रतिसाद बघून स्टारकास्टसह सोनाली बोस यांनी एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्यात. याचदरम्यान प्रियंकाला अश्रू अनावर झालेत. ती भावूक झाली. हा व्हिडीओ viralbhayani ने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.


 ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रियंका  खूप दिवसानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडचा भाग बनणार आहे. ती या चित्रपटाशी निर्माती म्हणूनही जोडली गेली आहे.
चित्रपटाची कहाणी  एका सत्यकथेवर आधारित आहे. अदिती आणि नरेन चौधरी आपली मुलगी आयेशा चौधरी जिला एक गंभीर आजार आहे.

चित्रपटात मुलीचा आजार आणि माता-पित्याचा संघर्ष दाखवला जाणार आहे. प्रियंकासोबत चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट मोटिवेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. सहा महिन्यांच्या वयात बोन मॅरो ट्रांसप्लांटचा सामना करणाºया आयेशाला काही काळानंतर साइड-इफेक्टमुळे पल्मोनरी फायबरोसिस सारखा घातक आजार झाला होता. केवळ 19 वर्षांच्या वयात तिचा मृत्यु झाला होता.

Web Title: priyanka chopra cried during the sky is pink premiere in toronto film festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.