चिमुकल्या मालतीला कडेवर घेऊन निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रियंका चोप्रा, व्हिडीओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:07 IST2023-10-17T13:04:01+5:302023-10-17T13:07:52+5:30
मालती मेरीचा एक क्युट फोटो व्हायरल होतोय. यात माय लेकीमधलं क्युट बॉन्डिंग दिसतेय.

चिमुकल्या मालतीला कडेवर घेऊन निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रियंका चोप्रा, व्हिडीओ होतोय व्हायरल
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. प्रियंका चोप्रा अनेकदा इन्स्टाग्रामवर स्वतःचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडतात. कधी प्रियंका चोप्रा निक जोनाससोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते, तर कधी तिची लेक मालती मेरीचे क्यूट फोटो व्हायरल होतात. यादरम्यान मालती मेरीचा एक क्युट फोटो व्हायरल होतोय. यात मायलेकीमधलं क्युट बॉन्डिंग दिसतेय.
मालती अनेकदा तिची आई प्रियंकासोबत कॉन्सर्टमध्ये सहभागी होताना दिसते. प्रियंका तिची मुलगी मालतीसोबत एका कॉन्सर्टच्या ठिकाणी एंट्री करतानाचा लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होतेय. यातील मालतीच्या क्युट अंदाजने लोकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रियंका चोप्रा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. अभिनेत्रीने आपली मुलगी मालतीला कडेवर घेतले आहे. यात छोटी मालती मस्ती करताना दिसली. खरं तर, मालतीने कान्सर्टच्या ठिकाणी एंट्री घेताच पॅप्सला बघून हात हालवताना दिसली. चिमुकल्या मालतीची ही कृती पाहून प्रियंकाला हसू आवरत आले नाही. चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
जोनास ब्रदर्स अनेक आठवड्यांपासून म्युझिकल दौऱ्यावर आहेत. प्रियंकाने जवळजवळ प्रत्येक जोनास ब्रदर्स कॉन्सर्टमध्ये चिमुकल्या मालतीसह हजेरी लावली आहे. दरम्यान निक आणि प्रियांकाने 1 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवनमध्ये रितीरिवाजांनी विवाह केला. मालतीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता.