आता प्रियंका चोप्राचीच हवा, एसएस राजामौली अन् महेश बाबूनंतर अल्लू अर्जूनसोबत काम करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:39 IST2025-04-04T15:37:54+5:302025-04-04T15:39:22+5:30
प्रियंकाच्या हाताला आणखी एक चित्रपट लागला आहे.

आता प्रियंका चोप्राचीच हवा, एसएस राजामौली अन् महेश बाबूनंतर अल्लू अर्जूनसोबत काम करणार
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येही तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ग्लोबल आयकॉन बनलेल्या प्रियंकाच्या कारकिर्दीचे वारे उंच शिखरावर वाहत आहेत. हॉलिवूड आणि बॉलिवूड नाही तर प्रियंका आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीदेखील गाजवणार आहे. प्रियंकाचा ऑस्कर विजेते एस.एस राजामौली आणि महेश बाबू यांच्यासोबतचा 'SSMB29' चित्रपट सर्वाधिक चर्चेत तर आहेच, पण आता प्रियंकाच्या हाताला आणखी एका सुपरस्टारचा चित्रपट लागला आहे.
१००० हजार कोटींच बजेट असलेला 'SSMB29' हा चित्रपट अजून प्रदर्शितही झालेला नसला तरी प्रियंका चोप्राला नव्या चित्रपटाची ऑफर आली आहे. एस.एस राजामौली अन् प्रभासनंतर आता प्रियंका 'पुष्पराज' अर्थात अल्लू अर्जूनसोबत काम करणार आहे. नुकतंच अल्लू अर्जूनच्या 'पुष्पा २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. जगभरातून १८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. अल्लू अर्जून (Allu Arjun) आणि दिग्दर्शक अॅटली कुमार (Atlee Kumar) हे एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. या अॅटली प्रियंका चोप्राला कास्ट करू इच्छितो आहे. जर सर्व काही व्यवस्थित पार पडलं तर दोन टॉप क्लास स्टार एकत्र परफॉर्म करताना पाहायला मिळणार आहेत.
अॅटली कुमार बऱ्याच काळापासून या चित्रपटावर काम करत आहे. रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुन या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे. तो नुकताच दुबईहून खास मेकओव्हर करून परतला आहे. त्याच्या लूकची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. याआधी त्यानं शाहरुख खानसोबत काम केलं होतं. या जोडीनं 'जवान' हा हीट चित्रपट दिला होता. प्रियंकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर "हेड्स ऑफ स्टेट" मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यामध्ये तिन इद्रिस एल्बा आणि जॉन सीना सोबत स्क्रीन शेअर केली आहे. याव्यतिरिक्त ती "द ब्लफ"मध्येही दिसणार आहे.
.