गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 07:00 PM2018-11-17T19:00:00+5:302018-11-17T19:00:00+5:30

सध्या संपूर्ण देशाचे दीपवीरनंतर प्रियांका चोप्राच्या लग्नाकडे लागले आहे. लग्नासाठी काही दिवस बाकी असताना प्रियांकाचा होणारा नवरा निक जोनासशी संबंधीत एक बातमी समोर येते आहे

Priyanka chopra fiance nick jonas infected with diabetes type 1 | गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना

गेल्या १३ वर्षांपासून प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास करतोय 'या' आजाराचा सामना

googlenewsNext
ठळक मुद्देप्रियांकाला काही दिवसांपूर्वी तिला अस्थमा असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होतेआता निक जोनासने त्याला आजारा असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे.

सध्या संपूर्ण देशाचे दीपवीरनंतर प्रियांका चोप्राच्या लग्नाकडे लागले आहे. लग्नासाठी काही दिवस बाकी असताना प्रियांकाचा होणारा नवरा निक जोनासशी संबंधीत एक बातमी समोर येते आहे. प्रियांकाला काही दिवसांपूर्वी तिला अस्थमा असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर आता निक जोनासने त्याला  'टाईप १’ चा मधुमेह असल्याचे सांगितले आहे. 


निकने ट्विटवर लिहिले आहे की,  ‘१३ वर्षांपूर्वी मला ‘टाईप १’ चा मधुमेह झाल्याचं निदान झालं होते. त्यामुळे माझं वजन कमी झाले होते. माझ्या रक्तातील साखरेचं प्रमाण खूप जास्त होते. त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन केलेल्या तपासणीमध्ये मला मधुमेह झाल्याचं समोर आलं’, असं निकने ट्विट करत सांगितले आहे.
यानंतर त्यांने दोन ट्वीटदेखील केले आहेत ज्यात त्यांने लिहिले आहे की, आता मी माझ्या प्रकृतीची काळजी घेतो. वर्क आऊट करतो. खाण्यापिण्यात पथ्य पाळतो. सातत्याने ब्लड शुगर तपास असतो. या आजारावर मी आता संपूर्णपणे नियंत्रण मिळवले आहे. माझ्या कुटुंबियांनी आणि मित्र परिवाराने मला यात साथ दिल्याबाबत त्यांचे मनापासून आभार मानतो.  


निक आणि प्रियांका जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत यांच्या लग्नाचा सोहळा चालणार आहे. या कपल आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे.आता हे लग्न किती ग्रँण्ड होईल, याची कल्पनाच न केलेली बरी. प्रियांका आणि निक दोघे राजस्थानमध्ये लग्न करणार असून हा एक खाजगी सोहळा असणार आहे.
 

Web Title: Priyanka chopra fiance nick jonas infected with diabetes type 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.